शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात दिल्ली, मुंबई व जयपूरमध्ये धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2015 01:17 IST

आयपीएल टी-२0 क्रिकेट सामन्यांशी संबंधित सट्टेबाजी टोळीविरुद्ध हवाला आणि अवैध सावकारी प्रकरणाच्या चौकशीसंबंधी दिल्ली, मुंबई आणि जयपूरसह अनेक शहरांत धाडी टाकल्या.

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने आयपीएल टी-२0 क्रिकेट सामन्यांशी संबंधित सट्टेबाजी टोळीविरुद्ध हवाला आणि अवैध सावकारी प्रकरणाच्या चौकशीसंबंधी दिल्ली, मुंबई आणि जयपूरसह अनेक शहरांत धाडी टाकल्या. सूत्रांनुसार या शहरातील आठ ते दहा इमारती आणि ठाणे, तसेच गुडगाव येथेही धाडी टाकण्यात आल्या. अहमदाबाद कार्यालयाने या शहरात आपल्या स्थानिकांच्या सहकार्याने छापे मारले. सूत्रांनी म्हटले, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सट्टेबाजीत सक्रिय असणाऱ्यांविरुद्ध तपासासाठी या धाडी टाकण्यात आल्या. एजन्सीने दहा मे रोजीदेखील अशाच प्रकारच्या धाडी टाकल्या होत्या. यावर्षी आयपीएल सामन्यादरम्यानच्या सट्टेबाजीत सहभागी संशयितांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. अंमलबजावणी संचालनालयाच्या अहमदाबाद कार्यालयाच्या आदेशावर मारण्यात आलेल्या धाडीत हवाला आणि बेकायदेशीर सावकारीच्या आरोपाचा तपास करण्यात येत आहे. या प्रक्रियेत ३0 पेक्षा जास्त अधिकारी सहभागी होते. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय राजधानी आणि जवळपासच्या भागात धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यात दिल्लीत दोन कथित सट्टेबाजांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ रोख २६ लाख रुपये, संगणक, मोबाइल आणि हार्ड ड्राइव्ह जप्त करण्यात आले होते. मार्च महिन्यात अहमदाबाद कार्यालयाने सट्टेबाजीचे एक रॅकेट उघड केल्याचा दावा करताना वडोदराच्या बाहेरच्या परिसरातील स्थित एका फार्म हाऊसमध्ये काही सट्टेबाजांना अटकही केली होती. त्यानंतर १३ व्यक्तींना अटक केली होती, तसेच दोन प्रमुख संशयित आणि अन्य काही जणांविरुद्ध बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यांचे रॅकेट १ हजार ते ४ हजार कोटींदरम्यान असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे