शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

दीपिका कुमारीकडून विश्वविक्रमाची बरोबरी

By admin | Updated: April 27, 2016 20:36 IST

भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकण्यासोबतच महिला रिकर्व्ह प्रकारात विश्वविक्रमाशी बरोबरी साधली.

शांघाय : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकण्यासोबतच महिला रिकर्व्ह प्रकारात विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. जागतिक तिरंदाजी क्रमवारीत माजी अव्वल खेळाडू राहिलेल्या दीपिकाने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णांची कमाई केली होती. तिने आज ७२ नेम साधताना ६८६ गुण संपादन करीत लंडन आॅलिम्पिकची सुवर्ण विजेती कोरियाची किबो बाई हिच्या विक्रमाशी बरोबरी केली. किबो बाईने लंडन आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात दोन सुवर्ण जिंकले होते. २०१५ साली तिने ग्वांगझृ येथे आपलीच सहकारी पार्क सूंग हून हिचा ११ वर्षे जुना ६८२ गुणांचा जुना विश्वविक्रम मोडीत काढला होता. दीपिकाने पहिल्या टप्प्यात ३४६ गुणांची कमाई करीत आश्चर्याचा धक्का दिला. कोरियाच्या खेळाडूचा विक्रम मोडीत काढण्यासाठी आणखी नऊ गुणांची गरज होती; पण दीपिकाला ही कामगिरी मात्र करता आली नाही. अव्वल मानांकित दीपिकाला आत थेट ३२ खेळाडूंमध्ये तिसरी फेरी खेळण्याची संधी मिळणार आहे. लक्ष्मीराणी मांझी आणि रिमिल बुरुली या दोन्ही भारतीय खेळाडू पहिल्या फेरीपासून सुरुवात करतील. भारतीय महिला संघाला स्पर्धेत चौथे मानांकन मिळाले आहे. मिश्र प्रकारात दीपिकाने अतनू दाससोबत तुर्कीच्या जोडीला ५-३ ने पराभूत केले. पण, उपांत्य फेरीत भारतीय जोडी चायनीज तैैपेईकडून ३-५ ने पराभूत झाली. आता कांस्यपदकासाठी ही जोडी लढत देणार आहे. कोरिया संघ दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अमेरिकेकडून ०-६ ने पराभूत झाला. पुरुष रिकर्व्ह पात्रता फेरीत अतनू दास, जयंत तालुकदार आणि मंगलसिंग चम्पिया यांनी तिसरे स्थान मिळविले.(वृत्तसंस्था)