शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्याचा निर्णय पूर्णतः धोनीचा स्वतःचा - प्रसाद

By admin | Updated: January 9, 2017 18:08 IST

धोनीला कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडलं हे वृत्त चुकीचं आहे,कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय पूर्णतः धोनीचा स्वतःचा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा स्वतःहून दिला नव्हता तर त्याच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता आणि त्याला कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडलं हे वृत्त चुकीचं आहे असं स्पष्टीकरण बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी दिलं आहे.
 
कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय पूर्णतः धोनीचा स्वतःचा निर्णय होता असं प्रसाद म्हणाले आहेत. धोनीला कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडलं असा खळबळजनक आरोप बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी केला होता त्यावर प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 
 
काय होता आदित्य वर्मांचा आरोप ?
गुजरात आणि झारखंड संघादरम्यान झालेल्या रणजी उपांत्य सामन्यात झारखंड क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमिताभ चौधरी यांनी धोनीकडे खेळण्याचा आग्रह धरला होता. मात्र, खेळण्यास नकार देत धोनीने संघासोबत मार्गदर्शक म्हणून राहण्याची तयारी दाखवली.  धोनी मार्गदर्शन करत असतानाही झारखंड संघाचा या सामन्यात पराभव झाला होता. ही संधी साधून चौधरी यांनी 4 जानेवारी रोजी बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांना फोन केला आणि धोनीला त्याच्या भविष्यातील प्लानबाबत विचारणा करण्यास सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने  याबाबत वृत्त दिलं होतं. 
 
चौधरी यांच्या सांगण्यावरूनच प्रसाद यांनी धोनीला फोन केला आणि  भविष्यातील प्लानबाबत विचारणा केली. अशी विचारणा होणे हे धोनीसाठी धक्कादायक होते.  त्यामुळे धोनीने त्याचदिवशी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं वर्मा म्हणाले होते.