दोराईराजन क्रिकेट
By admin | Updated: July 1, 2014 22:08 IST
रुबी क्लबची मुजुमदार क्लबवर आघाडी
दोराईराजन क्रिकेट
रुबी क्लबची मुजुमदार क्लबवर आघाडीदोराईराजन स्मृती क्रिकेट स्पर्धानागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एम.एन. दोराईराजन स्मृती क्रिकेट स्पर्धेतगुरुवारी मुजुमदार क्लबचा पहिला डाव १२८ धावांतच संपला. दिवसअखेर रुबी क्लबने ३ बाद १७१ धावा करून पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. नवनिकेतन क्लबचा अक्षय वाडकर, इंडियन जिमखानाचा अलिंद नायडू यांनी शतक ठोकून तसेच इलेव्हन स्टारच्या मोहम्मद करीमने पाच तसेच रुबी क्लबचा नीलेश बन्सोडने सहा गडी बाद करीत पहिला दिवस गाजविला. कळमना येथील व्हीसीए मैदानावर सुरू झालेल्या तीन दिवसीय सामन्यात रुबी क्लबच्या नीलेश बन्सोडच्या भेदक गोलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुजुमदार क्लबचा एकही फलंदाज खेळपट्टीवर दीर्घकाळ स्थिरावू शकला नाही. संघाचा पहिला डाव ४०.५ षटकांत १२८ धावांतच संपला. रुबी क्लबने पहिल्या दिवसअखेर ४७ षटकांत ३ गडी गमावून १७१ धावा केल्या. रेशीमबाग येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावरील सामन्यात ॲडव्होकेट एकादशचा पहिला डाव १८६ धावांत संपला. इलेव्हन स्टारने पहिल्या दिवसअखेर ६ गडी गमावून १४२ धावा केल्या आहेत. डॉ. आंबेडकर कॉलेजच्या मैदानावर एमएसएससीविरुद्ध नवनिकेतन क्लबने ६ गडी गमावून ४४७ धावा केल्या आहेत. अक्षय वाडकर १८० धावांवर खेळत आहे. सिव्हिल लाईन्स येथील व्हीसीए स्टेडियमवरील सामन्यात इंडियन जिमखानाने रेशीमबाग जिमखानाविरुद्ध ८ गडी गमावून ३५६ धावा उभारल्या. अलिंद नायडू ११६ धावांवर नाबाद आहे.संक्षिप्त धावफलक: न्यू इंग्लिश स्कूल मैदान : ॲडव्होकेट एकादश (पहिला डाव)-५०.३ षटकांत सर्वबाद १८६ (जन्मजय आचार्य ७३, शुभम दुबे ३२, ग्यानी कौशिक ३१. मोहम्मद करीम ५/८१, संकेत सुभेदार ३/४८, चंद्रशेखर बनकर २/७). इलेव्हन स्टार (पहिला डाव)- ३७ षटकांत ६ बाद १४२ (ऋषभ राठोड नाबाद ४६, पवन चंदेल ३९, आदित्य शनवारे ३५. शहनवाज खान ४/५२. नीलेश नवांगे, जयसिंग बघेल प्रत्येकी १ गडी). डॉ. आंबेडकर कॉलेज मैदान : नवनिकेतन क्लब (पहिला डाव)-९० षटकांत ६ बाद ४४७ (अक्षय वाडकर नाबाद १८०, अक्षय कर्णेवार ८४, आकाश झा ८०, प्रियांशू फुलसुंगे ४३. सोहम पाठक ३/९४, स्नेहल खामनकर, यू. टेंभरे, संतोष यादव प्रत्येकी १ गडी).सिव्हिल लाईन्स व्हीसीए स्टेडियम : इंडियन जिमखाना (पहिला डाव)- ९३ षटकांत ८ बाद ३५६ (अलिंद नायडू नाबाद ११६, सिद्धेश वाठ ९८, अंकुश वाकोडे ६०, विजय कोडापे नाबाद २५. संकेत दीक्षित ४/९२, कासीफ अन्वर २/७८, कुंजन पटेल, अमित देशपांडे प्रत्येकी १ गडी).कळमना व्हीसीए मैदान : मुजुमदार क्लब (पहिला डाव): ४०.५ षटकांत सर्वबाद १२८ (परिमल देऊळकर ४६, सचिन शेंडे ३८, अग्रीम परमार १२, नीलेश बन्सोड ६/४४, सचिन कटारिया २/१९, आशिष गावंडे, मानस सहारे प्रत्येकी १ गडी). रुबी क्लब (पहिला डाव) : ४७ षटकांत ३ बाद १७१ (मोहम्मद इकलाक ८१, सचिन कटारिया ४९, अनिरुद्ध चोरे नाबाद २३, मिथिलेश गुणेरिया नाबाद ७. राहुल जांगीड २/११, रोहन शर्मा १/२७). (क्रीडा प्रतिनिधी)