शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावर दडपण होते : ख्रिस गेल

By admin | Updated: February 25, 2015 01:24 IST

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने मंगळवारी विश्वकप स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत द्विशतकी खेळी केली.

कॅनबेरा : जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने मंगळवारी विश्वकप स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत द्विशतकी खेळी केली. माझ्यावर धावा काढण्याचे दडपण होते, अशी प्रतिक्रिया गेलने या विक्रमी खेळीनंतर दिली. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात गेलने वेगवान द्विशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. माझ्याकडून चाहत्यांना द्विशतकी खेळीची अपेक्षा होती आणि अखेर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला, असेही गेल म्हणाला. गेल्या दोन वर्षांत निराशाजनक कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या गेलने २०१३ नंतर प्रथमच शतकाची वेस ओलांडली. गेल म्हणाला, ‘‘माझ्यावर धावा फटकाविण्याचे दडपण होते. कारकिर्दीत प्रथमच माझ्याकडून धावांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. टिष्ट्वटरवर सर्व चाहते मला धावा फटकाविण्यासाठी म्हणत होते. माझ्याकडून बऱ्याच चाहत्यांना चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरल्यामुळे समाधानी आहे. चार खेळाडूंचा नियम अस्तित्वात आल्यानंतर मी केवळ एकदा अर्धशतकी खेळी केली, पण आता मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला.’’गेल विश्वकप स्पर्धेत द्विशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे; पण वन-डे क्रिकेटमध्ये यापूर्वी भारताच्या तीन फलंदाजांनी द्विशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे. त्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. रोहितने दोनदा असा पराक्रम केला आहे. आता वयाचा प्रभाव जाणवत असल्याचे ३५ वर्षीय गेलने कबूल केले. गेल म्हणाला, ‘‘अनेकदा चाहत्यांना कल्पना नसते, की खेळाडू कुठल्या परिस्थितीत आहे. मी दुखापतींनी त्रस्त होतो आणि वयाचाही प्रभाव जाणवत होता. मी या लढतीत जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर उभा राहण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीपूर्वी अशा प्रकारची खेळी करण्यास प्रयत्नशील होतो.’’