मनाऊस : स्ट्रायकर मारियो मॅडजुकिच याने उत्तरार्धात नोंदविलेल्या 2 गोलमुळे क्रोएशियाने 1क् खेळाडूंसोबत खेळणा:या कॅमेरुनला 4-क्ने धक्का देत फिफा विश्वचषकाबाहेर ढकलले.
क्रोएशियाला यजमान ब्राझीलकडून पहिल्या सामन्यात पराभवाचा फटका बसल्यानंतरही अ गटाच्या दुस:या सामन्यात या संघाने विजयाची चव चाखून पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या. दुसरीकडे पराभवासाठी कॅमेरुन स्वत: जबाबदार ठरला. अलेक्झांडर सोंग याने मॅडजुकीचच्या पाठीवर जोरदार पंच मारल्यामुळे रेफ्रीने त्याला रेड कार्ड दाखविताच अखेरच्या 5क् मिनिटांत कॅमेरुनला 1क् खेळाडूंसह खेळावे लागले. या पराभवाआधीच कॅमेरुन संघ इतका बिथरला, की या संघातील दोन खेळाडू परस्परांशी भांडले. असोऊ इकोटे याने सहकारी बेंझामिन मोकांदजो याच्यावर डोक्याने (हेड बट) प्रहार केला. क्रोएशियाचा अनुभवी स्ट्रायकर उविका ओलिच याने 11व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली.
सामन्याआधीच कॅमेरुनचा कर्णधार सॅम्युअल इटो याच्या गुडघ्यात त्रस उमळल्याने त्याला बाहेर बसावे लागले. एका सामन्यासाठी बाहेर झाल्यामुळे ब्राझीलविरुद्ध सलामीचा सामना न खेळू शकलेल्या मॅडजुकिचने क्रोएशियासाठी चक्क दोन गोल नोंदविले. या दरम्यान खेळाडूंमध्ये परस्पर समन्वय नसल्यामुळे कॅमेरुनची बचाव फळी खिळखिळी वाटत होती. बार्सिलोनाचा नवा खेळाडू इव्हान रकितिच याला क्रोएशियासाठी पाचवा गोल नोंदविण्याची संधी होती. पण, त्याने चेंडू बाहेर मारल्याने गोल होऊ शकला नाही. (वृत्तसंस्था)
इवान पेरिसिच याने 48व्या मिनिटाला दुसरा गोल केला. यानंतर मॅडजुकिचने 61 आणि 73व्या मिनिटांना दोन गोल केले. या निकालानंतर अ गटात क्रोएशिया संघ ब्राझील व मेक्सिकोपाठोपाठ तिस:या स्थानावर आहे. सोमवारी या गटात क्रोएशियाला मेक्सिकोविरुद्ध खेळायचे आहे.