शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

‘चेल्सी’ची गुणतक्त्यात निर्णायक आघाडी

By admin | Updated: December 29, 2014 04:26 IST

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (दि. २७) ‘चेल्सी’ने वेस्ट हॅम युनायटेडवर २-० अशी मात केली.

मॅँचेस्टर : इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (दि. २७) ‘चेल्सी’ने वेस्ट हॅम युनायटेडवर २-० अशी मात केली. या विजयामुळे ‘चेल्सी’चे ४५ गुण झाले असून चेल्सीने गुणतक्त्यात निर्णायक आघाडी घेतली आहे. दुसऱ्या स्थानी मँचेस्टर सिटी असून त्यांचे ४२ गुण आहेत.सामन्याच्या प्रारंभापासूनच ‘वेस्ट हॅम युनायटेड’ने आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला वेस्ट हॅमच्या अ‍ॅँडी कॅरॉलने मारलेला चेंडू गोल पोस्टला घासून गेला. यानंतर मात्र चेल्सीने आपला खेळ उंचावण्यास प्रारंभ केला. त्यांनी चेंडू जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. ‘चेल्सी’च्या आॅस्कर, गॅरी चाहील आणि विल्यम यांनी ‘वेस्ट हॅम’च्या गोलपोस्टवर वारंवार आक्रमण केले.अखेर सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला चेल्सीला गोल करण्यात यश मिळाले. दिएगो कोस्टाने दिलेल्या पासवर आॅस्करने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर चेल्सीने आपला खेळ आणखी उंचावला. सामन्याच्या ६० व्या मिनिटाला एडन हजार्डने दिलेल्या पासवर दिऐगा कोस्टाने गोल करत २-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात वेस्ट हॅम युनायटेडने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, ‘चेल्सी’च्या बचाव फळीपुढे त्यांचे काही चालले नाही. निर्धारित वेळत चेल्सीने सामना २-० असा जिंकला. (वृत्तसंस्था)