शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

क्रिकेटपटू हुसैनची तुरुंगात रवानगी

By admin | Updated: January 9, 2015 01:36 IST

क्रिकेटपटू रुबेल हुसैनची बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली ढाक्यातील एका न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे़

ढाका : पुढील महिन्यात आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपसाठी बांगलादेश संघात समावेश असलेला क्रिकेटपटू रुबेल हुसैनची बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली ढाक्यातील एका न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे़ बांगलादेशमधील एका अभिनेत्रीने गत महिन्यात हुसैनविरुद्ध बलात्कार आणि लग्नाचे खोटे आश्वासन दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती़ यानंतर हुसैनने गुरुवारी न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती़ त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही दाखल केला होता़ मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आणि त्याची तुरुंगात रवानगी केली़ आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी बांगलादेशच्या १५ सदस्यीय राष्ट्रीय संघात समावेश असलेल्या रुबेलला १५ डिसेंबर रोजी न्यायालयाने चार आठवड्यांचा तात्पुरता जामीन मंजूर केला होता़ मात्र, जामिनाची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते़ रुबेलला जेलची हवा खावी लागल्यामुळे आता २४ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलियाला रवाना होणाऱ्या बांगलादेश संघासोबत तो जाईल किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याच्या जागी बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) अन्य खेळाडूची निवड करण्याची शक्यता आहे़ बीसीबीचे सीईओ निजामुद्दीन चौधरी यांनी सांगितले की, या प्रकरणावर मला सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही़ हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे़ मात्र, या प्रकरणात तथ्य आढळून आल्यास आम्हाला त्याचा पर्याय शोधावा लागेल़ (वृत्तसंस्था)