शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडासंहितेत क्रिकेटचादेखील समावेश असावा : क्रीडामंत्री

By admin | Updated: May 11, 2017 00:41 IST

केंद्र सरकार नवी क्रीडासंहिता लवकरच लागू करणार असून, क्रिकेटचा समावेश तीत असायला हवा, असे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार नवी क्रीडासंहिता लवकरच लागू करणार असून, क्रिकेटचा समावेश तीत असायला हवा, असे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी म्हटले आहे.न्या. आर. एम. लोढा यांच्या समितीने संवैधानिक बदल सुचविताच सर्वांत श्रीमंत संघटना असलेले भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) नव्या बदल प्रक्रियेतून जात आहे. बीसीसीआय स्वत:ला क्रीडासंहितेचा भाग मानत नाही. आम्ही शासकीय अनुदान घेत नसल्यामुळे क्रीडाधोरण लागू होत नसल्याचे बीसीसीआयचे मत आहे. गोयल हे बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांच्या शेजारी बसले होते. ते पुढे म्हणाले, ‘‘हा प्रश्न केवळ बीसीसीआयपुरता मर्यादित नाही. माझ्या मते, सर्वच खेळ क्रीडासंहितेच्या कार्यकक्षेत असायला हवेत.’’सध्या क्रीडासंहिता सर्वच खेळांना लागू होते. सर्वच क्रीडा महासंघ क्रीडासंहितेचे पालन करतात. अंतिम अहवाल तयार होताच आम्ही सर्वांसमक्ष तो मांडणार आहोत. नव्या संहितेत सहभागी होण्यास बीसीसीआयचा विरोध असल्याबाबतची माहिती माझ्याकडे नाही, असेही गोयल यांनी सांगितले.खन्ना यांनी मात्र यावर मतप्रदर्शनास नकार दिला. यावर योग्य वेळी चर्चा करू, इतकेच ते म्हणाले. सध्या मी कुठल्याही बाबीवर मत मांडणार नाही. गोयल यांना आयपीएलच्या अंतिम सामन्याचे निमंत्रण देण्यासाठी मी येथे आलो आहे. योग्य वेळ येताच आम्ही परस्परांमधील दुरावा दूर करू. सध्या तरी अशा प्रकारची चर्चा करण्यासाठी मी आलेलो नाही, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)