शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धा आर्थिक संकटात

By admin | Updated: June 24, 2015 23:37 IST

चिली येथे सुरू असलेल्या कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेची जुळवाजुळव करताना, आयोजकांना आर्थिक अडचणींचा सामना

असुनशियन : चिली येथे सुरू असलेल्या कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेची जुळवाजुळव करताना, आयोजकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा ही रक्कम कशीबशी उभारली जाईल; पण भविष्यात स्पर्धा आयोजनासाठी आर्थिक तरतूद करावीच लागेल, असा इशारा आयोजक दक्षिण अमेरिका फुटबॉल संघटनेने दिला आहे.पॅरॉग्वेचे फुटबॉलप्रमुख अलेक्झांड्रो यांनी पत्रकारांशी चर्चा करताना आर्थिक संकट; तसेच स्पर्धा आयोजन आणि बक्षिसांच्या रकमेबाबतच्या वृत्ताचे खंडन केले; पण भविष्यात अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमच्याकडे पुरेशी तरतूद नसल्याची कबुली दिली. ते पुढे म्हणाले, ‘विजेत्यांना बक्षिसांची रक्कम ही प्रायोजन आणि प्रसारण हक्क विक्रीतून होणाऱ्या नफ्यातून दिली जाते. त्यामुळे सध्याची स्पर्धा संकटमुक्त आहे असे म्हणावे लागेल.’ आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघावर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर अमेरिका आणि स्विस तपास संस्थेने तपास सुरू केल्यापासून काही कंपन्यांचे अकाऊंट सील झाले आहे. अशावेळी या कंपन्या कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे प्रायोजक म्हणून पैसा देऊ शकत नसल्याने हे संकट ओढवल्याचे वृत्त मीडियाने प्रकाशित केले होते. पॅराग्वे फुटबॉल संघटनेच्या प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा कुठल्याही आर्थिक अडचणीत नाही. ही स्पर्धा युरोपातील चॅम्पियन्स लीच्या बरोबरीची स्पर्धा मानली जाते. (वृत्तसंस्था)