शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

धोनीच्या तुलनेत अन्य यष्टिरक्षक आघाडीवर

By admin | Updated: May 14, 2014 01:55 IST

आयपीएलच्या सातव्या पर्वात भारतातील अन्य यष्टिरक्षक फलंदाजांनी धोनीच्या तुलनेत वर्चस्व गाजविले आहे. आयपीएलच्या सातव्या पर्वांत अनेक फ्रेंचायसी संघांनी भारतीय यष्टिरक्षक फलंदाजांना प्राधान्य दिले आहे.

नवी दिल्ली : चेन्नई सुपरकिंग्जचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीचा जगातील दिग्गज यष्टिरक्षक फलंदाजांमध्ये समावेश आहे. पण आयपीएलच्या सातव्या पर्वात भारतातील अन्य यष्टिरक्षक फलंदाजांनी धोनीच्या तुलनेत वर्चस्व गाजविले आहे. आयपीएलच्या सातव्या पर्वांत अनेक फ्रेंचायसी संघांनी भारतीय यष्टिरक्षक फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. दिनेश कार्तिकला दिल्ली डेअरडेव्हिल्सने साडेबारा कोटी रुपयांना करारबद्ध केले. आयपीएलमधील तो दुसरा सर्वांत महागड खेळाडू ठरला आहे. स्पर्धेत सोमवारपर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांतील कामगिरीच्या आधारावर धोनी भारतातील अन्य यष्टिरक्षक फलंदाजांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. धोनीने ९ सामन्यांत केवळ ३ झेल टिपले असून, १६९ धावा फटकाविल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या पार्थिव पटेलने ९ सामन्यांत यष्टिपाठी ११ बळी घेतले आहेत. यष्टिरक्षकांच्या शर्यतीत तो सर्वांत आघाडीवर आहे. पार्थिवने या स्पर्धेत १६२ धावा फटकाविल्या आहेत. गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना रिद्धिमान साहाने ९ सामन्यात ९ बळी घेतले व १०९ धावा फटकाविल्या आहेत. राजस्थान संघाचा युवा यष्टिरक्षक संजू सॅम्सनने ९ सामन्यात ७ बळी घेतले असून, १९३ धावा फटकाविल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या चिदंबरम गौतमने ८ सामन्यात ६ बळी घेतले असून, ११३ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या रॉबिन उथप्पाने ९ सामन्यात ६ बळी घेतले असून, ३०२ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. उथप्पाचे ६ पैकी ५ बळी यष्टिचितचे आहेत. सनरायजर्स हैदराबादच्या नमन ओझाने ६ सामन्यात ५ बळी घेतले असून, ६२ धावा फटकाविल्या आहेत. साडेबारा कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कार्तिकने ४ बळी घेतले असून, २३२ धावा फटकाविल्या आहेत. (वृत्तसंस्था)