शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोलमन भावंडांनी मुंबई जिंकली

By admin | Updated: March 5, 2017 23:59 IST

बूस्टर जेट्सच्या सॅम आणि डेसी या कोलमन भाऊ - बहिण जोडीने पहिल्या वहिल्या पी१ मुंबई ग्रां. प्री. पॉवरबोट स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्का मारला.

मुंबई : पहिल्या दोन शर्यतींवर राखलेले वर्चस्व अंतिम फेरीतही कायम राखून बूस्टर जेट्सच्या सॅम आणि डेसी या कोलमन भाऊ - बहिण जोडीने पहिल्या वहिल्या पी१ मुंबई ग्रां. प्री. पॉवरबोट स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्का मारला. सॅम - डेसीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच बूस्टर जेट्स संघाने स्पर्धेत सर्वांगिण विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे सीएस संतोष या भारतीय ड्रायव्हरचा समावेश विजयी संघात असल्याने या स्पर्धेच्या पहिल्याच भारतीय मोसमात तिरंगाही फडकला. शनिवारी दोन शर्यतींमध्ये कोलमन भावंडांनी एकहाती वर्चस्व राखताना संघाला मोठी गुणसंख्या मिळवून दिली. संतोष आणि त्याचा नेव्हीगेटर साथीदार यांनी पहिल्या दोन शर्यतींमधून १९ गुणांची समाधानकारक कामगिरी केली. त्याचवेळी लॉयड डॉल्फिन संघाने कडवी टक्कर देताना बूस्टर जेट्सला जवळपास गाठलेच होते. स्पर्धेच्या अंतिम दिवशीही या दोन संघांमध्येच रोमांचक चुरस रंगली होती. मात्र, कोलमन भावंडांनी निर्णायक भूमिका बजावताना अंतिम दिवशीही अव्वल स्थान राखताना संघाचे विजेतेपद सहजपणे निश्चित केले. बूस्टर जेट्सने सर्वाधिक ६० गुणांसह सांघिक विजेतेपदावर नाव कोरले. लॉयड डॉल्फिन संघाने ४७ गुणांसह उपविजेतेपद पटकावले, तर मनी आॅन मोबाईल मर्लिन्स संघाला ४६ गुणांसह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील अन्य भारतीय ड्रायव्हर असलेल्या गौरव गिलची कामगिरीही समाधानकारक राहिला. गौरवचा अल्ट्रा शार्क संघ ६४ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. तर, वैयक्तिक क्रमवारीत गौरवला ३४ गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)>पी१ पॉवरबोट इंडियन ग्रां. प्री. शर्यतीचे सांघिक विजेतेपद स्वीकारताना विजयी बूस्टर जेट्सचे खेळाडू. (डावीकडून) सी. एस. संतोष, मार्टिन रॉबिन्सन, सॅम कोलमन आणि डेसी कोलमन.>सांघिक क्रमवारी१. बूस्टर जेट्स- ८९ गुण२. लॉयड डॉल्फिन्स- ८७ गुण३. मनी आॅन मोबाईल मर्लिन्स- ७९ गुण४. अल्ट्रा शाकर््स- ६४ गुण५. मिर्ची मेवरिक्स- ४५ गुण६. एचव्हीआर रेसिंग- ३८ गुण