शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षक समन्वय साधणारा असावा - कपिल

By admin | Updated: May 26, 2015 01:51 IST

प्रशिक्षक भारतीय असावा की परदेशी हे महत्त्वाचे नसून खेळाडूंशी चांगला समन्वय साधणारा किंवा खेळाडूंना जवळचा वाटणारा असा प्रशिक्षक असावा,

मुंबई : प्रशिक्षक भारतीय असावा की परदेशी हे महत्त्वाचे नसून खेळाडूंशी चांगला समन्वय साधणारा किंवा खेळाडूंना जवळचा वाटणारा असा प्रशिक्षक असावा, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.मुंबईत सोमवारी एका दिमाखदार कार्यक्रमामध्ये वार्षिक सिएट क्रिकेट रेटींग पुरस्कार सोहळा पार पडला. दरम्यान कपिल देव यांना आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २०१४-१५ सालातील कामगिरी लक्षात घेऊन श्रीलंकेच्या कुमार संगकाराला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने आणि युवा अजिंक्य रहाणे याला सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचा प्रशिक्षक देशी असावा की परदेशी याविषयी कपिल म्हणाले की, परदेशी प्रशिक्षकाच्या बाबतीत खुपवेळा भाषेची अडचण असते. तीच स्थिती त्या प्रशिक्षकाची देखील होते. कारण त्यांना भारतीय भाषा अवगत नसते, यामुळे संघाचा समतोल राखण्यात अडचण येऊ शकते. जर का देशी प्रशिक्षक असेल तर संघातील प्रत्येक खेळाडूला त्या प्रशिक्षकासोबत मनमोकळेपणाने बोलता येते. अर्थात परदेशी प्रशिक्षकासोबत देखील प्रत्येक खेळाडू मोकळेपणाने बोलू शकतो. मात्र यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे, असेही कपिल यांनी सांगितले.विजेते खेळाडू:आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू:कुमार संगकारा (श्रीलंका)सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू : अजिंक्य रहाणेआंतरराष्ट्रीय फलंदाज :हाशिम आमला (द. आफ्रिका)आंतरराष्ट्रीय गोलंदाज : रंगणा हेराथ (श्रीलंका)सर्वोत्तम टी-२० खेळाडू : ड्वेन ब्रावो (वेस्ट इंडिय्ज)लोकप्रिय क्रिकेटपटू : किरॉन पोलर्ड (वेस्ट इंडिज)विशेष पुरस्कार : रोहित शर्मा (भारत)सर्वोत्तम देशांतर्ग क्रिकेटपटू : आर. विनय कुमार (कर्नाटक - कर्णधार)उदयोन्मुख खेळाडू : दीपक हूडा