शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘सीओए’ने घेतली ‘मुंबई’ची विकेट

By admin | Updated: March 20, 2017 00:08 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) कारभारात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने सुचविलेल्या

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) कारभारात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने सुचविलेल्या ‘एक राज्य, एक मत’ या शिफारशीचा अखेर मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) फटका बसला. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीने (सीओए) सर्वात मोठा निर्णय घेताना एमसीएचे पुर्ण सदस्यत्व काढून घेतले आहे. सीओएने बीसीसीआयच्या नव्या संविधानाची व दिशानिर्देशकाची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली असून याद्वारे एका राज्यातून केवळ एकच पुर्ण सदस्यत्व संघटना राहू शकते, हे स्पष्ट होत आहे. बीसीसीआयच्या संविधानाला अंतिम स्वरुप दिल्यानंतर सीओएने हा निर्णय घेतला. त्याचवेळी, या सीओएद्वारा बिहार, तेलंगना आणि उत्तर पुर्वेकडील राज्यांना पुर्ण सदस्यत्व बहाल करण्यात आले. विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे योगदान मुंबई क्रिकेटचे राहिले असल्याने सीओएने घेतलेला निर्णय धक्कादायक ठरला आहे.त्याचप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशींना मान्यता दिल्यानंतर एमसीएवर बंधन येणं हे अपेक्षित होतंच. परंतु, भारतीय क्रिकेटमधील असलेले भव्य योगदान पाहता एमसीएबाबत काहीतरी तोडगा काढण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सीओएने या सर्व आशांवर पाणी फेरले. दरम्यान, लोढा समितीच्या शिफारशींनुसार मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या पुर्वेकडील सर्व राज्यांना पुर्ण सदस्यत्व आणि मतदान देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तसेच, उत्तराखंड आणि तेलंगना राज्यांनाही हे अधिकार देण्यात आले. शिवाय बिहार राज्य संघटनेचे सर्व प्रलंबित प्रकरण संपल्यानंतरच त्यांना पुर्ण सदस्यत्व मिळेल. सीओएने घेतलेल्या या निर्णयानंतर ४१वेळचा रणजी चॅम्पियन एमसीए सहाय्यक सदस्य म्हणून बीसीसीआयमध्ये राहिल. त्याचप्रमाणे, गुजरात राज्याचे बडोदा आणि सौराष्ट्र यांनाही सहाय्यक सदस्य रहावे लागेल. त्याचप्रमाणे, एमसीएच्या प्रतिनिधींना बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधरण सभेमध्ये सहभागी होण्याची अनुमती देण्यात आली आहे. परंतु, त्यांना मतदान करण्याचे अधिकार नसतील. (क्रीडा प्रतिनिधी)