शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

चेन्नई सुपरकिंग्जची अव्वलस्थानी झेप

By admin | Updated: May 14, 2014 01:37 IST

अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने राजस्थान रॉयल्सवर मात करत आयपीएलच्या सातव्या पर्वात गुणतालिकेत अव्वलस्थानावर झेप घेतली.

राजस्थान रॉयल्सवर ५ गडी राखून मातरांची : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (नाबाद २६) आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा ५ गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात गुणतालिकेत अव्वलस्थानावर झेप घेतली. सुपरकिंग्ज संघाला विजयासाठी अखेरच्या २ षटकांत २५ धावांची गरज होती. धोनी व रवींद्र जडेजा (नाबाद ११) यांनी २ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईने राजस्थानचा डाव ८ बाद १४८ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १९.४ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. धोनीने १६ चेंडूंना सामोरे जाताना १ चौकार व १ षटकाराच्या साह्याने नाबाद २६ धावांची खेळी केली. जडेजाने ६ चेंडूंमध्ये नाबाद ११ धावांची खेळी करताना १ षटकार ठोकला. चेन्नई संघाच्या विजयात सलामीवीर ड्वेन स्मिथ (४४) आणि फॅफ ड्युप्लेसिस (३८) यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले. या विजयासह चेन्नईने १० सामन्यांत १६ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. पंजाब संघ १४ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे तर राजस्थान संघाचे १० सामन्यात १२ गुण आहेत.चेन्नई सुपरकिंग्ज :- ड्वेन स्मिथ झे. याज्ञिक गो. कूपर ४४, ब्रॅन्डन मॅक्युलम झे. नायर गो. अंकित शर्मा ०६, सुरेश रैना झे. भाटिया गो. अंकित शर्मा ०२, फॅफ ड्युप्लेसिस त्रि.गो. फॉकनर ३८, रविचंद्रन अश्विन त्रि.गो. भाटिया १४, महेंद्रसिंग धोनी नाबाद २६, रवींद्र जडेजा नाबाद ११. अवांतर (८). एकूण १९.४ षटकांत ५ बाद १४९. बाद क्रम : १-२०, २-४१, ३-७६, ४-१०५, ५-१२१. गोलंदाजी : अंकित शर्मा ४-०-२०-२, जेम्स फॉकनर ३.४-०-३७-१, प्रवीण तांबे ४-०-३४-०, केव्हिन कूपर ४-०-२५-१, रजत भाटिया ४-०-३०-१.