शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

चेन्नई-राजस्थान ‘आमने-सामने’

By admin | Updated: May 13, 2014 05:05 IST

चेन्नई सुपरकिंग्ज आणि तिसर्‍या स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स संघांदरम्यान मंगळवारी जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार्‍या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार

रांची : आयपीएलच्या सातव्या पर्वात दुसर्‍या स्थानावर असलेला चेन्नई सुपरकिंग्ज आणि तिसर्‍या स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स संघांदरम्यान मंगळवारी जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार्‍या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने या स्पर्धेत ९ पैकी ७ सामन्यात विजय मिळविला आहे, तर आॅस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने ९ पैकी ६ सामन्यांत विजयाला गवसणी घातली आहे. अव्वल तीन संघांमध्ये समावेश असलेल्या या दोन संघांची या स्पर्धेतील कामगिरी बघता, मंगळवारी उभय संघांदरम्यान खेळल्या जाणारी लढत रंगतदार होणार असल्याचे निश्चित आहे. धोनी गृहमैदानावर कशी कामगिरी करतो, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. रांची चेन्नई संघाचे दुसरे गृहमैदान आहे. चेन्नईमध्ये स्थानिक प्रशासनासोबत एम.ए. चिदंबरम स्टेडियममधील तीन स्टॅण्डबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पूर्वघोषित कार्यक्रमानुसार चेन्नईमध्ये खेळल्या जाणार्‍या लढती आता रांचीमध्ये खेळल्या जाणार आहेत. गृहमैदानावर धोनीपुढे संघाला विजय मिळवून देण्याचे आव्हान आहे. राजस्थान संघ जबरदस्त फॉर्मात आहे. बेंगळुरू विरुद्धच्या लढतीत धक्कादायक विजयाची नोंद केल्यामुळे राजस्थान संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. राजस्थान संघाने रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत बेंगळुरू विरुद्ध विशाल लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. राजस्थानच्या फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. राजस्थान संघात सलमीच्या जोडीपासून आठव्या क्रमांकापर्यंत सामना जिंकून देणार्‍या दर्जेदार फलंदाजांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे, करण नायर, शेन वॉटसन, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅम्सन, स्टिव्हन स्मिथ आणि जेम्स फॉकनर यांच्यामध्ये संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. राजस्थान संघातील सिनिअर लेगस्पिनर प्रवीण तांबे प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे. तांबेची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. राजस्थान संघाला रोखण्यासाठी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघापुढे चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान आहे. चेन्नई संघाने यापूर्वीच्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघावर ४ गडी राखून सरशी साधली होती. चेन्नई संघाचा सलामीवीर ड्वेन स्मिथ चांगल्या फॉर्मात आहे. स्मिथव्यतिरिक्त मॅक्युलम, रैना, फॅफ ड्यूप्लेसिस, धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)