शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला १७१ धावांचे आव्हान

By admin | Updated: April 20, 2016 21:52 IST

ट्राविस हेड व सरफराज खान यांनी केलेल्या हल्ल्याच्या जोरावर बंगळुरुने मुंबईपुढे विजयासाठी १७१ धावांचे आव्हान उभे केले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई : कर्णधार विराट कोहली व धडाकेबाज एबी डिव्हीलियर्स यांच्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल्स चँलेंजर्स बंगळुरुने मोठ्या धावसंख्येकडे कूच केली होती. मात्र कृणाल पांड्याने एकाच षटकात या दोघांचा बळी घेत मुंबई इंडियन्सला पुनरागमन करुन दिली. मात्र अखेरच्या क्षणी ट्राविस हेड व सरफराज खान यांनी केलेल्या हल्ल्याच्या जोरावर बंगळुरुने मुंबईपुढे विजयासाठी १७१ धावांचे आव्हान उभे केले.

वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबईकरांनी सुरुवातीला बंगळुरुला जखडवून ठेवले. मॅक्क्लेनघनचा एक भेदक बाऊंसर डोक्यावर आदळल्यानंतर बंगळुरुच्या लोकेश राहूलने मॅक्क्लेनघनलाच लक्ष्य करत एकाच षटकात २ षटकार व १ चौकार खेचून बंगळुरुच्या धावगतीला वेग दिला. मॅक्क्लेनघनने राहूलला (१४ चेंडूत २३ धावा) बाद करुन मुंबईला चौथ्या षटकात पहिले यश दिले. यानंतर एबीने कोहलीसह ५९ धावांची भागीदारी करुन मुंबईला पळवले. मात्र ११व्या षटकात कृणालने या दोघांचा बळी घेत सामना फिरवला.

कोहली ३० चेंडूत ३ चौकारांसह ३३ धावांवर बाद झाला. तर एबीने २१ चेंडूत ३ चौकार व एका उत्तुंग षटकारासह २९ धावा फटकावल्या. शेन वॉटसनही (५) जसप्रीत बुमराहचा शिकार ठरल्याने बंगळुरुचा डाव ४ बाद ९९ असा घसरला. दडपणाखाली आलेल्या बंगळुरुला सरफराज व हेड यांनी सावरताना ६३ धावांची आक्रमक भागीदारी केली. हरभजनने हेडला धावबाद करुन ही जोडी फोडली. तर बुमराहने अखेरच्या षटकात सरफराज व स्टुअर्ट बिन्नीला बाद करुन बंगळुरुला ७ बाद १७० धावांवर रोखले. हेडने २४ चेंडूत ३७ धावा फटकावल्या. तर सरफराजने १८ चेंडूत २८ धावांचा तडाखा दिला. मुंबईकडून बुमराह (३/३१), कृणाल (२/२७) यांनी चांगला मारा केला.