शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपॉललाही सन्मानाने निवृत्ती घेण्याचा हक्क

By admin | Updated: May 28, 2015 01:32 IST

आपल्या काळातील दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने अनुभवी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याला कसोटी संघातून बाहेर काढणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळावर जोरदार टीका केली आहे.

पोर्ट आॅफ स्पेन : आपल्या काळातील दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने अनुभवी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याला कसोटी संघातून बाहेर काढणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळावर जोरदार टीका केली आहे. बीसीसीआयने जशी सचिनला निवृत्ती घेण्याची संधी दिली होती, तशीच संधी गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी खेळणाऱ्या डावखुऱ्या चंद्रपॉललाही द्यायला हवी, असे लाराने म्हटले आहे.सलग सुमार कामगिरीमुळे आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी चंद्रपॉलला निवडण्यात आले नाही. डब्ल्यूआयसीबीच्या या वागण्यामुळे संतप्त लाराने, त्यांनी भारतीय क्रिकेट मंडळाकडून शिकवण घ्यायला हवी. त्यांनी तेंडुलकरला निरोप देण्यासाठी २0१३ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेचे आयोजन केले होते, असे सांगितले.चंद्रपॉलने १६४ कसोटी सामन्यांत ५१.३७ च्या सरासरीने ११ हजार ८६७ धावा केल्या. त्यात ३0 शतके आणि ६६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला लाराचा ११,९५३ धावांचा विक्रम तोडण्यासाठी फक्त ८६ धावांची गरज होती.चंद्रपॉलला बाहेर करण्यासाठी रेकॉर्डचे काही देणे-घेणे नसल्याचे लाराने म्हटले. तो म्हणाला, ‘‘या आकड्यांशी अथवा नंबरशी काहीही संबंध नाही. चंद्रपॉलला गेले ११ डाव रेकॉर्ड मोडण्यासाठी दिले होते हे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, चंद्रपॉलला सन्मानाने निवृत्ती स्वीकारण्याचा अधिकार आहे. खरे पाहता त्याला त्याच्या अटीनुसार निवृत्ती घेण्याची संधी द्यायला हवी.’’लाराने चंद्रपॉलला आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात घेण्याची विनंती केली आणि ही मालिका त्याच्या निरोपाची मालिका म्हणून मानायला हवी, असे सांगितले.तो म्हणाला, ‘‘या मालिकेत तो द्विशतक ठोको अथवा शून्यावर बाद होवो, हे जास्त महत्त्वाचे नाही आणि याचे कोणाला दु:खही होणार नाही. ही त्याची निरोपाची मालिका होईल आणि पूर्ण क्रिकेट जगताला हे माहीत होईल, याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. डब्ल्यूआयसीबी आणि कॅरेबियन हे शिवनारायणला सन्मानासह निरोप देण्यासाठी ऋणी आहेत आणि हा त्याने हक्क प्राप्त केला आहे.’’ (वृत्तसंस्था)त्यांनी (बीसीसीआय) काय केले, त्यांनी सचिनच्या सन्मानार्थ एक कसोटी मालिका आयोजित केली आणि त्याचे योगदान पाहता त्याला शानदार निरोप दिला आणि येथे त्याने (चंद्रपॉल) आपले सर्व काही अर्पण केले आणि त्या बदल्यात आम्ही काय केले, तर त्याला संघाबाहेर केले.- ब्रायन लारा