शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स लीग पात्रता हेच प्राधान्य

By admin | Updated: May 21, 2017 01:23 IST

मेसूत ओझिल याने आर्सेनलसाठी या सत्रात शानदार प्रदर्शन केले. त्याने १२ गोल नोंदवले. असे असले तरी त्याचे योगदान संघासाठी कितपत फायद्याचे ठरेल, हे पाहणे

- मेसूत ओझिलशी बातचीत...मेसूत ओझिल याने आर्सेनलसाठी या सत्रात शानदार प्रदर्शन केले. त्याने १२ गोल नोंदवले. असे असले तरी त्याचे योगदान संघासाठी कितपत फायद्याचे ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण पुढील सत्रात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेसाठी त्यांचा एक सामना शिल्लक आहे. इमिरात येथे एव्हर्टनविरुद्ध उद्या आर्सेनलला विजयासाठीच मैदानात उतरावे लागेल. आर्सेनलसाठी चांगली बातमी अशी, की एफए चषकाच्या अंतिम सामन्यात त्यांना चेल्सीविरुद्ध भिडावे लागेल. जर्मनीचा सुपरस्टार मिडफिल्डर मेसूत ओझिल हा आपल्या संघाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करेल. व्यवस्थापक वेंगर्स याचे भविष्यही उद्याच्या निकालावर बरेच अवलंबून आहे. या सामन्याबाबत ओझिल याच्यासोबत साधलेला संवाद...प्रश्न - चॅम्पियन्स लीग गाठण्यासाठी आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी आर्सेनलला संधी आहे. हे तुझ्या हातात जरी नसले तरी याबाबत तू काय सांगशील?- बरेच काही. निश्चितच, चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळवणे प्रत्येकासाठीमहत्त्वाचे आहे. जगातील चांगल्या क्लबपैकी एक असा आर्सेनल आहे. प्रश्न - एक खेळाडू म्हणून काय वाटते? वैयक्तिकरीत्या तुला किती महत्त्वाचे वाटते?- जसे इतर खेळाडूंना वाटत असते तसेच. एक खेळाडू म्हणून चॅम्पियन्स लीगचे महत्त्व अधिक आहे. खेळाडूपेक्षा चाहता म्हणून ही स्पर्धा खास आहे. त्यामुळे आमच्यासाठी ती महत्त्वाची आहे. प्रश्न : गेल्या ४ वर्षांपासून तू चॅम्पियन्स लीगमध्येआर्सेनलकडून खेळत आहेस, तुला संघाच्या ताकदीबाबत काय वाटते?- आमचे मोठे ध्येय आहे. ते अजून संपलेले नाही. आर्सेनल महान क्लब आहे. ते त्या पात्रतेचेही आहेत म्हणून खूप मेहनत घेत आहोत.प्रश्न - आर्सेनल जर पात्र ठरू शकला नाही तर तू दुसरीकडे जाण्याचा विचार करीत आहेस काय? कारण तुझा नवीन करार अजून झालेला नाही. याबद्दल काय सांंगशील?- मी तसा विचार करीत नाही. चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळवणे हेच माझ्यासाठी प्राधान्यक्रमाचे आहे. सर्व एकत्र मिळून नंतर भविष्याचा विचार करू. प्रश्न - आर्सेनलकडून तू आतापर्यंत खूश आहेस?निश्चितच, गेल्या चार वर्षांपासून मी येथे खेळत आहे. एका कुटुंबाकडून खेळल्यासारखे वाटते. खूप सोयीचा असा हा क्लब आहे. सध्या आम्ही एक टीम म्हणून खेळत आहोत, ते महत्त्वाचे आहे. आमच्यापुढे चांगले ध्येय आहे. कोणत्याही परिस्थितीत पहिल्या चारमध्ये येण्याचे आमचा प्रयत्न आहे. प्रश्न - तुझ्यावर टीकाही केली जात आहे. तू संघासाठी मेहनत घेत नाहीस असेही म्हटले जात आहे. हे तुला दुखावणारे नाही?- करिअरच्या सुरुवातीला तसे वाटायचे. कारण मला अनुभव नव्हता. पण आता मी त्याकडे दुर्लक्ष करतो. लोक काय म्हणतील हे महत्त्वाचे नाही. कोच काय सांगतो ते महत्त्वाचे आहे. लोक म्हणतात ते सर्वच बरोबर असते असे नाही.