शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तान प्लेट गटात ‘चॅम्पियन’

By admin | Updated: February 13, 2016 01:32 IST

सांघिक व अष्टपैलू खेळाचे शानदार प्रदर्शन करताना अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक स्पर्धेत प्लेट गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी दुसऱ्या

कॉक्सबाजार (बांगलादेश) : सांघिक व अष्टपैलू खेळाचे शानदार प्रदर्शन करताना अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने विश्वचषक स्पर्धेत प्लेट गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने दणदणीत विजयासह इंग्लंडवर ७ विकेट्सने मात करून स्पर्धेत पाचव्या स्थानी कब्जा केला.तारिक स्टेनिकझईने झळकावलेल्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने झिम्बाब्वेला अनपेक्षित धक्का दिला. नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २१६ धावांची मजल मारली. अर्धा संघ ८५ धावांत गमावल्यानंतर यष्टिरक्षक रायन मरे (५३) आणि विलियम मशिंगे (६६) यांच्या निर्णायक अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने दोनशेचा टप्पा पार केला. झिया उर रेहमान व मुस्लीम मुसा यांनी प्रत्येकी ३ बळी घेत झिम्बाब्वेला रोखले. यानंतर सावध सुरुवात करताना अफगाणिस्तानने ४६.५ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. दुसऱ्या बाजूला फतुल्लाह येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा ७ विकेट्सने धुव्वा उडवून पाचव्या स्थानी बाजी मारली. (वृत्तसंस्था)पाकिस्तानने केवळ ३ फलंदाज गमावून इंग्लंडला नमवले. सलामीवीर झीशान मलिकने (९३) महत्त्वपूर्ण खेळी करताना संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याचे शतक ७ धावांनी हुकले, तर अखेर सैफ बदर (नाबाद ७५) व हसन मोहसीन (नाबाद ३९) यांनी विजयावर शिक्का मारला.