शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

‘चोकर्स’चा डाग पुसण्याचे दक्षिण आफ्रिकेपुढे आव्हान

By admin | Updated: February 7, 2015 01:40 IST

क्रिकेटविश्वातील सर्वात ‘अनलकी’ कोणता संघ असेल तर तो दक्षिण आफ्रिका. चार वर्षे पूर्ण तयारी करायची आणि ऐन मोक्याला अवसानघातकी कामगिरी केल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडायचे ही या संघाची खासियत.

विश्वास चरणकर - कोल्हापूरक्रिकेटविश्वातील सर्वात ‘अनलकी’ कोणता संघ असेल तर तो दक्षिण आफ्रिका. चार वर्षे पूर्ण तयारी करायची आणि ऐन मोक्याला अवसानघातकी कामगिरी केल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडायचे ही या संघाची खासियत. यावर मात करण्यासाठी ए. बी डिव्हीलियर्सच्या नेतृत्त्वाखालील संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.१९७0 पासून वर्णभेदाच्या प्रकरणावरुन बंदी भोगत असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने १९९१ साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरामगन केले, आणि थोड्याच कालावधीत एक बलाढ्य संघ म्हणून आपले स्थान निर्माण केले. पुढच्याच वर्षी म्हणजे १९९२ साली आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली. उपांत्यफेरीत इंग्लंडविरुध्दचा सामना जिंकणे त्यांना सहज शक्य होते, परंतु सामन्याचे १३ चेंडू शिल्लक असताना पाउस आला यावेळी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी हव्या होत्या २२ धावा. पण पावसाने दोन षटकांचा खेळ गिळंकृत केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी एका चेंडूत २१ धावा करण्याचे सुधारीत लक्ष्य देण्यात आले, जे अशक्यप्राय होते. अशा तऱ्हेने दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये पोहचता पोहचता अनलकी ठरला.या स्पर्धेपासून आतापर्यंत विश्वविजयाने त्यांना सतत हुलकावणी दिली आहे. १९९२ची कसर १९९६मध्ये भरुन काढण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले, पण ऐन महत्त्वाच्या क्षणी नशीबाने त्यांना दगा दिला. साखळी फेरीतील सर्व म्हणजे पाचही सामने जिंकून त्यांनी मोठ्या थाटामाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पण कराचीत झालेल्या वेस्ट इंडीजविरुध्दच्या सामन्यात ब्रायन लाराने शतकी खेळी करुन दक्षिण आफ्रिकेला नॉकआउट केले.या दुर्दैवाच्या फेऱ्याचा क्लायमॅक्स तर १९९९ साली झाला. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात हातातोंडाशी आलेला घास त्यांना गमवावा लागला. सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेची गाठ पडली आॅस्ट्रेलियाशी. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाने सर्वबाद २१३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरवात केली, पण त्यांची अवस्था ४ बाद ६१ अशी झाली. जॉन्टी ऱ्होडस आणि जॅक कॅलिस यांनी या संकटातून संघाला सावरले. शेवटच्या षटकांत विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला हव्या होत्या केवळ ९ धावा. क्रीजवर होती लान्स क्लुजनर आणि अ‍ॅलन डोनाल्ड ही शेवटची जोडी अन गोलंदाज होता डेमियन फ्लेमिंग.फ्लेमिंगच्या पहिल्या दोन चेंडूवर क्लुसनरने दणादण दोन चौकार ठोकून सामना बरोबरीत आणला. शेवटच्या चार चेंडूत त्यांना विजयासाठी हवी होती केवळ एक धाव, तर आॅस्ट्रेलियाला हवी होती विकेट. तिसऱ्या चेंडूवर धाव निघाली नाही, अन डोनाल्ड धावचित होता-होता वाचला. क्लुसनरचा फटका मिडविकेटवरील मार्क वॉकडे गेला. क्लुसनरने धावायला सुरवात केली, पण नॉनस्ट्रायकरवरील डोनाल्डने त्याचा कॉल ऐकलाच नाही. तो चेंडूकडे पहात होता. पण जेव्हा त्याच्या लक्षात आले की क्लुसनर धावत सुटलाय तेव्हा तो धावला पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता. मार्क वॉने चेेंडू गोलंदाज फ्लेमिंगकडे फेकला, त्याने प्रसंगावधान राखून तो यष्टीरक्षक गिलख्रिस्टकडे टाकला, आणि डोनाल्ड धावचित झाला. सामना टाय झाला पण, सुपरसिक्समध्ये आॅस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरविले असल्यामुळे आॅस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले. कधी नशिबाने किंवा कधी ऐनवेळी केलेल्या हाराकिरीमुळे संघ अंतिम फेरीत पोहचतच नाही. त्यामुळे या संघावर चोकर्स असा शिक्का पडला आहे. हा शिक्का पुसण्याचे आव्हान यंदा त्यांच्यापुढे आहे. यंदाच्या विश्वचषकात ए. बी. ए. बी डिव्हीलियर्सच्या नेतृत्त्वाखाली सहभागी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात जागतिक दर्जाच्या गोलंदाज आणि फलंदाजांची फौज आहे. कागदावर आणि मैदानावर हा संघ बलाढ्य वाटतो. एबीने नुकतेच ३१ चेंडूत सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. तो गेल, पोलार्ड, धोनी या जातकुळीतील धडाकेबाज फलंदाज आहे. जोडीला शांत, संयमी पण तितकाच चिवट हासिम आमला, ड्युमिनी, ड्यूप्लेसिस, अ‍ॅबोट, मिलर असे एकापेक्षा एक शिलेदार आहेत. कौंटोन डी कॉक हा यष्टीरक्षक चांगली फलंदाजी करतो आहे. गोलंदाजीत जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक असणारा आणि स्टेनगनसारखा धडाडणारा डेल स्टेन याच्यारुपाने ब्रम्हास्त्र आफ्रिकन संघाकडे आहे. बेहार्डीन, फिलँडर, मोर्ने मोर्कल, पार्नेल असे एकापेक्षा एक नामांकित स्टेनचे साथीदार आहेत. फांगिसो आणि इम्रान ताहिर हे फिरकीची बाजू सांभाळण्यास सक्षम आहेतदक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला (उपकर्णधार), कायले अ‍ॅबॉट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जीन पॉल डुमीनी, फा डू प्लेसिस, इमरान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वॅन पार्नेल, अ‍ॅरोन फंगिसो, वेर्नोन फिलेंडर, रिली रोसोवू, डेल स्टेन