शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

सीसीआय उपांत्य फेरीत

By admin | Updated: June 14, 2015 01:51 IST

गोरेगाव स्पोटर््स क्लब आणि यजमान सीसीआय या बलाढ्य संघांनी आपआपल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना महिलांच्या उल्लाल चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

मुंबई : गोरेगाव स्पोटर््स क्लब आणि यजमान सीसीआय या बलाढ्य संघांनी आपआपल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना महिलांच्या उल्लाल चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत कल्पिता सावंत - संजना संतोष या जोडीने एकतर्फी झालेल्या दुहेरी लढतीत पूजा मर्चंट - अनिश मिरचंदानी यांचा २१-६, २१-५ असा धुव्वा उडवून गोरेगाव एससीला पीजे हिंदू जिमखाना विरुद्ध १-० असे आघाडीवर नेले. यानंतर झालेल्या एकेरीच्या सामन्यात गोरेगावच्या शाझीया खानने आक्रमक खेळाच्या जोरावर पीजे हिंदू संघाच्या रज्वी संपतचा २१-११, २१-१६ असा पराभव करुन संघाला उपांत्य फेरीत नेले.सीसीआय संघाने देखील व्हीपीएमएस विरुध्द अपेक्षित विजय मिळवताना दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या दुहेरी लढतीत यजमानांच्या करीना मदन - वैष्णवी अय्यर यांनी धडाकेबाज विजय मिळवताना ऐश्वर्या - अपेक्षा गिरप यांचा २१-१, २१-१५ असा पाडाव केला. यानंतर रिया आरोलकरने अनघा करंदकरचा २१-३, २१-६ असा फडशा पाडून सीसीआयच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.अन्य एका लढतीत एमएलडब्ल्यूबी आणि खार जिमखाना या संघांनी देखील सहज विजय मिळवताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. एमएलडब्ल्यूबी संघाने अनपेक्षित बाजी मारताना बॉम्बे जिमखानाचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले. तर खार जिमखानाने देखील २-० असा विजय मिळवताना अनुभवी एनएससीआयचे आव्हान संपुष्टात आणले. (क्रीडा प्रतिनिधी)