शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘अडथळा शर्यतीत स्पर्धा विक्रमाचा सिद्धांत’

By admin | Updated: February 13, 2015 00:35 IST

महाराष्ट्राच्या सिद्धांत थिगालियाने पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत १३.८३ सेकंदांची वेळ नोंदवून स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.

तिरुअनंतपुरम : महाराष्ट्राच्या सिद्धांत थिगालियाने पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत १३.८३ सेकंदांची वेळ नोंदवून स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. केरळ विद्यापीठ स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या अ‍ॅथलेटिक्स प्रकारात सिद्धांत थिंगालियाने पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पटकाविले. सिद्धांतने २००१मध्ये गुरप्रीतसिंगने केलेला १४.१० से. विक्रम मोडीत काढला. या प्रकारात महाराष्ट्राच्या अनिश जोशीला मात्र पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सायकलिंग : पुरुषांच्या ३० किलोमीटर पॉइंट रेस प्रकारात महाराष्ट्राच्या अरविंद पनवारने ४१ गुण संपादन करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. अभिनंदन भोसलेला २१ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सकाळी झालेल्या पुरुषांच्या ४ किलोमीटर सांघिक परस्यूट प्रकारात महाराष्ट्राच्या प्रीतसिंग, अरविंद पनवार, गणेश पवार व अभिनंदन भोसले या चौघांनी ४ मि. ५५.२२८ से. वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले. तलवारबाजी : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी अनुक्रमे इपी व सायबर प्रकारात कांस्यपदक आपल्या नावावर केले. पुरुष गटात कर्नाटकाविरुद्ध झालेल्या लढतीत अजिंक्य दुधारेने आपल्या नावाला साजेसा अफलातून खेळ करीत कर्नाटकच्या खेळाडूविरुद्ध बचावात्मक आणि प्रति-आक्रमणाचा खेळ करीत २२ विरुद्ध ५ गुणांनी पराभव करून आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली. सागर मगरेने ६ व अक्षय देशमुखने ८ गुण संपादन केले. महिलांच्या सांघिक सायबर प्रकारात अस्मिता दुधारेने १२, निशा पुजारीने १८ व स्नेहल विधातेने १५ गुण संपादन करून कांस्यपदक जिंकले. महिलांच्या १० हजार मी. धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्रच्या स्वाती गाढवेने ३४:५९.७३ वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. स्वातीचे हे दुसरे पदक आहे. कविता राऊतला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)