शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

ब्राझीलला हवा फक्त ड्रॉ

By admin | Updated: June 23, 2014 04:58 IST

पाच वेळा विश्वचॅम्पियन राहिलेला ब्राझील संघ उद्या, सोमवारी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘अ’ गटात कॅमेरूनचा सामना करणार आहे़

ब्रासिलिया : पाच वेळा विश्वचॅम्पियन राहिलेला ब्राझील संघ उद्या, सोमवारी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘अ’ गटात कॅमेरूनचा सामना करणार आहे़ या लढतीत ब्राझीलची बाजू वरचढ दिसत आहे़ दुसरीकडे स्पर्धेच्या बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झालेला कॅमेरून संघ आपल्या अखेरच्या लढतीत सर्वोत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करेल़ स्पर्धेतील ‘अ’ गटात ब्राझील संघ चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे़ त्यांना अंतिम १६ संघांत आपले स्थान निश्चित करण्यासाठी केवळ सामना बरोबरीत ठेवावा लागणार आहे़ कॅमेरून संघाला स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत हार पत्करावी लागली होती़ त्यामुळे हा संघ स्पर्धेतून आधीच बाहेर झाला आहे़ त्यामुळे हा संघ ब्राझीलविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी उत्सुक असेल़ संघाच्या इतिहासावर नजर टाकल्यास यजमान ब्राझील संघाची बाजू वरचढ दिसते़ या दोन्ही संघांत झालेल्या चारपैकी तीनमध्ये ब्राझीलने विजय मिळविला आहे़ कॅमेरून संघाने २००३ च्या कन्फेडरेशन चषकात एकदा ब्राझीलवर मात केली होती़ आतापर्यंत झालेल्या २० विश्वचषकामध्ये खेळणारा ब्राझील हा एकमेव संघ आहे़ हा विश्वचषक ब्राझीलमध्ये होत असल्यामुळे हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे़ संघांत नेमारसह जुलिओ सेजार, डॅनिएल एल्वेस, थियागो आणि डेव्हिड लुईससारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत.या खेळाडूंच्या बळावर संघ कॅमेरूनविरुद्ध सहज विजय मिळवू शकतो़ दुसरीकडे कॅमेरून संघ १९९० मध्ये विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता़ हीच त्यांची विश्वचषकमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे़ त्यानंतर त्यांना एकदाही बाद फेरीत प्रवेश मिळविता आलेला नाही़ कॅमेरूनला स्पर्धेत मेक्सिकोकडून ०-१ आणि त्यानंतर क्रोएशियाने त्यांना ४-० असे पराभूत केले होते़ सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे़ आपल्या अखेरच्या लढतीतही हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांची नजर असणार आहे़ (वृत्तसंस्था)