शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंग, कबड्डी, नेमबाजीत छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:25 IST

भारतीय बॉक्सर्सनी स्पर्धेतील सर्व सातही सुवर्णपदक पटकावल्यानंतर नेमबाजांनीही २५ सुवर्णवेध घेताना आपल्या मोहिमेची शानदार सांगता केली.

गुवाहाटी : भारतीय बॉक्सर्सनी स्पर्धेतील सर्व सातही सुवर्णपदक पटकावल्यानंतर नेमबाजांनीही २५ सुवर्णवेध घेताना आपल्या मोहिमेची शानदार सांगता केली. या जोरावर भारताना १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) आपला दबदबा कायम राखला.मंगळवारी समारोप होणाऱ्या या स्पर्धेत भारताने १८१ सुवर्ण, ८८ रौप्य आणि ३० कांस्य अशी लयलूट करताना आतापर्यंत एकूण पदकसंख्या २९९ वर नेली आहे. त्याचवेळी श्रीलंका १८१ पदकांसह (२५ सुवर्ण, ६० रौप्य व ९६ कांस्य) आणि पाकिस्तान १०० पदकांसह (११ सुवर्ण, ३५ रौप्य व ५५ कांस्य) पदकांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत.बॉक्सर्स व नेमबाजांप्रमाणेच ज्युडो खेळाडूंनीही ७ सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई केली. तसेच भारताने महिलांच्या फुटबॉलमध्ये नेपाळचा ४-० असा धुव्वा उडवून सुवर्ण मिळवले. तर पुरुषांमध्ये नेपाळने बलाढ्य भारताला २-१ असे नमवून अनपेक्षित सुवर्ण पटकावले. हँडबॉल पुरुष व महिला गटात अनुक्रमे पाकिस्तान व बांगलादेशला नमवून भारताने सुवण जिंकलेगुरप्रीत, श्वेता यांचा ‘सुवर्णवेध’भारतीय नेमबाजांनी अखेरच्या दिवशी क्लीनस्वीप करत नेमबाजीत एकूण २६ पैकी २५ सुवर्णपदके जिंकली. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या गुरप्रीत सिंगने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये २८ अचूक नेम साधत सुवणवेध घेतला. श्वेता सिंगने १० मीटर एअर पिस्तूल गटात १९४.४ गुणांसह सुवर्ण जिंकले. हीना सिद्धूला मात्र रौप्यवर समाधान मानावे लागले.