शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गोलंदाजांनी मिळवून दिला विजय

By admin | Updated: April 17, 2017 01:22 IST

शार्दूल ठाकूर, बेन स्टोक्स आणि जयदेव उनाडकट या त्रिकुटाच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर रायजिंग पुणे सुपर जायंट संघाने आज येथे आपल्या धावसंख्येचा चांगला बचाव

बंगळुरू : शार्दूल ठाकूर, बेन स्टोक्स आणि जयदेव उनाडकट या त्रिकुटाच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर रायजिंग पुणे सुपर जायंट संघाने आज येथे आपल्या धावसंख्येचा चांगला बचाव करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा २७ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे आयपीएलच्या दहाव्या पर्वात त्यांनी दुसऱ्या विजयाची नोंद केली.प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे (३०) आणि राहुल त्रिपाठी (३१) यांनी सलामीसाठी ६३ आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ (२७) व महेंद्रसिंह धोनी (२८) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केली; परंतु त्यानंतर त्यांनी ९ चेंडू आणि ३ धावांच्या आत ५ फलंदाज गमावले. अखेरीस मनोज तिवारीने ११ चेंडूंत २७ धावा ठोकताना पुणे संघाला ८ बाद १६१ या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रत्युत्तरात आरसीबीची सुरुवात खराब झाली. पुणे संघाने कर्णधार विराट कोहली (१९ चेंडूंत २८) याला बाद करीत आरसीबीला जोरदार धक्का दिला. एबी डीव्हीलियर्स (३० चेंडूंत २९) हादेखील आपला प्रभाव उमटवू शकला नाही.अखेरीस आरसीबी संघाला आपल्या घरच्या मैदानावर ९ बाद १३४ धावाच करता आल्या.पुणे संघाने फक्त ५ गोलंदाजांचा उपयोग केला. स्टोक्सने १८ धावांत ३ आणि शार्दूल ठाकूरने ३५ धावांत ३ गडी बाद केले. उनाडकट याने २५ धावांत २ बळी घेतले. या तिघांना इम्रान ताहिर, डॅनियल क्रिस्टियन यांनी सुरेख साथ दिली.पुणे संघाचा हा आरसीबीवर पहिला विजय आहे. या विजयामुळे रायजिंग पुणे सुपर जायंट संघाचे ५ सामन्यांत ४ गुण झाले आहेत व ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. आरसीबीचा हा पाच सामन्यांतील चौथा पराभव ठरला असून, ते अखेरच्या आठव्या स्थानावर फेकले गेले आहेत.संक्षिप्त धावफलकरायजिंग पुणे सुपर जायंट : २० षटकांत ८ बाद १६१. (राहुल त्रिपाठी ३१, अजिंक्य रहाणे ३०, महेंद्रसिंह धोनी २८, स्टीव्ह स्मिथ २७, मनोज तिवारी नाबाद २७. अ‍ॅडम मिल्ने २/२७, एस. अरविंद २/२९, पवन नेगी १/१२, सॅम्युअल बद्री १/३२, शेन वॉटसन १/४४)आरसीबी : २० षटकांत ९ बाद १३४. (डीव्हीलियर्स २९, विराट कोहली २८, केदार जाधव १८, स्टुअर्ट बिन्नी १८. बेन स्टोक्स ३/१८, शार्दूल ठाकूर ३/३५, जयदेव उनाडकट २/२५).