शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बोपन्नाचे पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद

By admin | Updated: June 9, 2017 04:13 IST

ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले

पॅरिस : रोहण बोपन्नाने गुरुवारी कॅनडाची त्याची सहकारी ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला. बोपन्ना व डाब्रोवस्की या सातव्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत शानदार पुनरागमन केले. त्यांनी दोन मॅच पॉर्इंटचा बचाव करताना जर्मनीच्या अन्ना लेना गोरेनफिल्ड व कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीची झुंज २-६, ६-२, १२-१० ने मोडून काढली. भारत व कॅनडा यांची जोडी एकवेळ दोन गुणांनी पिछाडीवर होती, पण गोरेनफिल्ड व फराह यांनी संधी गमावली. बोपन्ना व डाब्रोवस्की यांनी पूर्ण लाभ घेतला आणि दोन मॅच पॉर्इंट मिळवले. जर्मनीच्या खेळाडूने दुहेरी चूक करताच बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीचे जेतेपद निश्चित झाले. बोपन्नाने कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याने २०१० मध्ये पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हकच्या साथीने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यावेळी त्याला अंतिम लढतीत ब्रायन बंधूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागले होते. पहिला सेट गमावणाऱ्या बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीने दुसऱ्या सेटममध्ये सरशी साधत १-१ अशी बरोबरी केली. निर्णायक सेटमध्ये बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीने ३-० अशी अघाडी घेतली होती. त्यानंतर सलग पाच गुण गमावल्यामुळे ही जोडी ३-५ ने पिछाडीवर पडली. त्यानंतर त्यांनी ५-५ अशी बरोबरी साधली. सामन्याचे पारडे अखेरपर्यंत दोलायमान असलेल्या या लढतीत शेवटी बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीने सरशी साधली. (वृत्तसंस्था)>‘‘ आम्ही दुसऱ्या सेटमध्ये दडपण न बाळगता खेळलो. त्यामुळे नैसर्गिक खेळ करता आला. आम्ही सांघिक कामगिरी करण्यात यशस्वी ठरलो. अंतिम लढत असल्यामुळे रिटर्न व सर्व्हिसवर गरजेपेक्षा अधिक जोर दिला. पहिल्या सेटनंतर सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर दिला. एकमेकांचे मनोधैर्य उंचावण्यावर भर दिला आणि हेच कारण निकालातील अंतर स्पष्ट करणारे ठरले. सूर गवसल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करता आली.’’रोहण बोपन्ना>बोपन्नापूर्वी केवळ लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या भारतीय खेळाडूंनी ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.