शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

फटक्यांची आतिषबाजी! यंदाच्या आयपीएलमध्ये चौकार-षटकारांद्वारे फटकावल्या गेल्या दहा हजार धावा

By admin | Updated: May 22, 2017 19:59 IST

नेहमीप्रमाणे यंदाच्या हंगामातही आयपीएलच्या मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पडला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढतीने आयपीएलच्या दहाव्या हंगामाची सांगता झाली. नेहमीप्रमाणे यंदाच्या हंगामातही आयपीएलच्या मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पडला. स्पर्धेच्या क्वालिफायर फेरीत जरी गोलंदाजांचा दबदबा दिसून आला असला तरी साखळी फेरीत फलंदाजांचा बोलबाला राहिला. यंदाच्या आयपीएलच्या हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 10 हजार 662 धावा  चौकार-षटकारांद्वारे फटकावल्या गेल्या. 
 
आयपीएल 10 मध्ये एकूण 60 सामने खेळवले गेले. त्यात सर्व 8 संघांनी मिळून 18 हजार 775 धावा बनवल्या. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या धावांपैकी निम्म्यांहून अधिक धावा या चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून वसूल करण्यात आल्या. यंदा फलंदाजांनी एकूण 705 षटकार तर 1608 चौकार लगावले. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामना क्र. 51 मध्ये फलंदाजांनी एकूण 62 वेळी चौकार आणि षटकारांच्या रुपात चेंडू सीमापार धाडला. 
 
आयपीएल 10 मध्ये डेव्हिड वॉर्नर सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 641 धावा कुटत ऑरेंज कॅप पटकावली. तर 498 धावांसह कोलकाता नाइट राटडर्सचा कर्णधार गौतम गंभीर दुसऱ्या स्थानी राहिला. वॉर्नरने यंदाच्या हंगामात एक शतकी खेळीसुद्धा केली. तसेच एका डावात 126 धावांसह तो यंदाच्या हंगामात एका डावात सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाजही ठरला. तसेच आयपीएलमध्ये यंदा एकूण 5 शतके आणि 95 अर्धशतके फटकावली गेली.