शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
5
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
6
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
7
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
8
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
9
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
10
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
12
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
13
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
14
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
15
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
16
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
17
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
18
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
19
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
20
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

युवीने घेतला मास्टर ब्लास्टरचा आशीर्वाद

By admin | Updated: May 9, 2016 22:52 IST

भारताचा स्टार अष्टपैलू युवराज सिंगही यास अपवाद नसून सचिनप्रती असलेला आदर व्यक्त करताना तो थेट सचिनच्या पाया पडला.

विशाखापट्टणम : क्रिकेटवेड्या भारतामध्ये क्रिकेट हा खेळ नाही तर धर्म मानला जातो. तर, याचा सर्वस्व म्हणजे अर्थातच सचिन तेंडुलकर. आज प्रत्येक क्रिकेटपटू याच मास्टर ब्लास्टरला आपला आदर्श मानून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. विशेष म्हणजे सध्याच्या टीम इंडियामध्येही अनेक असे क्रिकेटपटू आहेत जे सचिनमुळेच या खेळाकडे वळले असून त्यालाच आपल्या यशाचे श्रेय देतात. भारताचा स्टार अष्टपैलू युवराज सिंगही यास अपवाद नसून सचिनप्रती असलेला आदर व्यक्त करताना तो थेट सचिनच्या पाया पडला. नुकताच विशाखापट्टणम येथे झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान हा प्रसंग झाला. फलंदाजी करून मैदानाबाहेर जात असताना युवीने सचिनच्या पाया पडून त्याचे आभार मानले. विशेष म्हणजे या वेळी सचिनने युवीला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र युवीने सचिनचे काहीही न ऐकता आपल्या देवाला नमस्कार केलाच.या प्रसंगाचा फोटो अल्पावधीतच सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. दखल घेण्याची बाब म्हणजे सचिनचा मुलगा अर्जुननेही या फोटोवर कमेंट करताना युवीचे आभार मानले. युवीने याआधीही २०१४ मध्ये लॉर्डस् मैदानावर झालेल्या विशेष सामन्यात एमसीसी एकादशचा कर्णधार असलेल्या सचिनच्या पाया पडून आशीर्वाद घेतले होते. तसेच विराट कोहलीने यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर सचिनला अभिवादन केले होते. (वृत्तसंस्था)