शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये या भारतीय खेळाडूची मोठी झेप

By admin | Updated: March 30, 2017 17:02 IST

ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिळालेल्या मालिका विजयाचा भारतीय संघाला आणि संघातील खेळाडूंना चांगलाच फायदा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिळालेल्या मालिका विजयाचा भारतीय संघाला आणि संघातील खेळाडूंना चांगलाच फायदा झाला आहे. भारताचा कसोटी क्रिकेटमधील सलामीचा फलंदाज लोकेश राहुलने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये मोठी झेप घेतली आहे. 
 
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत राहुलने दमदार प्रदर्शन केलं होतं. धरमशालामध्ये झालेल्या शेवटच्या कसोटीच्या दोन्ही डावात राहुलने अर्धशतक झळकावलं होतं. या खेळीच्या बळावर राहुल फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीमध्ये 11 व्या नंबरवर पोहोचला आहे. कर्नाटकचा हा खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका सुरू होण्याआधी 57 व्या क्रमांकावर होता. मालिकेतील दमदार प्रदर्शनाच्या बळावर त्याने 46 क्रमांकांनी झेप घेतली आहे. या सोबतच राहुल आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे तर न्यूझिलंडचा कॅप्टन केन विल्यम्सन दुस-या नंबरवर आहे. 
 
कसोटी क्रमवारीत चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर तर विराट कोहली पाचव्या नंबरवर आला आहे. याखेरीज अजिंक्य रहाणे 14 व्या आणि मुरली विजय 34 व्या क्रमांकावर आहे.  गोलंदाजांमध्ये रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन दोघंही संयुक्तरीत्या अव्वल स्थानावर कायम आहेत. तर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चांगल्या प्रदर्शनचा फायदा जलदगती गोलंदाज उमेश यादवला झाला आहे. पाच क्रमांकांनी झेप घेऊन उमेश 21 व्या नंबरवर आला आहे. 
 
कसोटी अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे तर आर अश्विनला मागे टाकत रविंद्र जडेजा दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे.