शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पाकच्या राष्ट्रीय संघासाठी मोठा धक्का’

By admin | Updated: December 28, 2015 03:30 IST

आयसीसीने लेग स्पिनर यासीर शाह याच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई केल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी राष्ट्रीय संघाला मोठा धक्का बसला आहे,

कराची : आयसीसीने लेग स्पिनर यासीर शाह याच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई केल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी राष्ट्रीय संघाला मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे निवड समितीप्रमुख हारून राशीद यांनी व्यक्त केली. दरम्यान, आयसीसी डोपिंगविरोधी नियमानुसार यासीर प्रकरण हाताळत आहे; त्यामुळे याबाबत कुठले वक्तव्य करणार नाही, असे पीसीबीचा प्रवक्ता म्हणाला.पीसीबीचा प्रवक्ता म्हणाला, ‘‘आयसीसीच्या नियमानुसार सर्व प्रकिया सुरू आहे. माझ्या मते, यासीरवर तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघातील त्याच्या समावेशाची शक्यता धूसर झाली आहे.’’ पीसीबीच्या सूत्रानी सांगितले, की यासीरवर दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. यासीर रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काही औषध घेत होता. संघाचे वैद्यकीय अधिकारी व पीसीबीला याबाबत त्याने माहिती दिली नाही, ही मोठी चूक आहे.’’ संघव्यवस्थापनाने खेळाडूंनी कुठल्या आजारासाठी कुठले औषध घ्यावे, यावर लक्ष दिले नाही. त्यामुळे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान हेसुद्धा संघव्यवस्थापनावर नाराज आहेत, असेही या सूत्राने सांगितले. यासीरवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे निवड समितीचा वादग्रस्त वेगवान गोलंदाज मोहंमद आमिरचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात समावेश करण्याचा मार्ग सुकर झाला आहे, हे विशेष. पाकिस्तान क्रिकेटला रोज एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आता आम्हाला आगामी स्पर्धांसाठी साऱ्या योजना नव्याने तयार कराव्या लागणार आहेत.- हारून राशीद, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड निवड समिती प्रमुख