अजय नायडू - नॉटिंघम
मोहम्मद शमीने भुवनेश्वर कुमारसह अखेरच्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारी नोंदविल्यानंतर आज इंग्लंडला पहिल्या डावात सुरुवातीलाच धक्का देत भारताला पहिल्या कसोटी सामन्यात वर्चस्व मिळवून दिले.
भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांनी भेदक मारा करीत इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. शमीने इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकला (5) बोल्ड केले. दुस:या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडने 1 बाद 43 धावांची मजल मारली होती. दिवसअखेर सॅम रॉबसन (2क्) आणि गॅरी बॅलेन्स (15) खेळपट्टीवर आहेत.
त्याआधी, भुवनेश्वर कुमार (58) व मोहम्मद शमी (नाबाद 51) यांनी अखेरच्या गडय़ासाठी केलेल्या 111 धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 457 धावांची मजल मारली. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची दमछाक करीत उपाहारार्पयत कालचा नाबाद शतकवीर मुरली विजय (146 धावा) याला गमवून 5 बाद 342 अशी मजल गाठली.
भारताने सकाळी 4 बाद 259 वरून पुढे धोनी आणि विजय यांनी खेळ सुरू केला. मॅट प्रायरने ङोल सोडून धोनीला 52 धावांवर असताना जीवदान दिले. 11 व्या षटकांत विजय-धोनी यांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. विजयला अँडरसनने पायचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. टीव्ही रिप्लेत मात्र हा चेंडू यष्टीच्या वरून जात असावा असे दिसत होते. विजयने 361 चेंडू टोलवून 25 चौकार व एक षट्कार मारला.
रविंद्र जडेजाला स्टुअर्ट बिन्नीच्या आधी संधी मिळाली. जडेजा (25) आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. शतकाकडे वाटचाल करणारा कर्णधार धोनी (82) अँडरसनच्या थेट फेकीवर धावबाद झाला. त्यानंतर मात्र भारताची 6 बाद 344 धावसंख्येवरुन 9
बाद 346 अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर मात्र भुवनेश्वर व शमी यांनी डाव सावरला. (वृत्तसंस्था)
च्भुवनेश्वर (58) व शमी (51*) यांनी दहाव्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी करीत भारताला पहिल्या डावात 457 धावांची दमदार मजल मारुन दिली.
च्यापूर्वी मुरली विजय (146) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी
(82) यांनी भारताच्या डावात उल्लेखनीय योगदान दिले.
धावफलक
भारत प. डाव : मुरली विजय पायचित गो. अँडरसन 146, शिखर धवन ङो. प्रायर गो. अँडरसन 12, चेतेश्वर पुजारा ङो. बेल गो. अँडरसन 38, विराट कोहली ङो. बेल गो. ब्रॉड क्1, अजिंक्य रहाणो ङो. कुक गो. प्लंकेट 32, महेंद्रसिंग धोनी धावबाद 82, रवींद्र जडेजा ङो. प्रायर गो. स्टोक्स 25, स्टुअर्ट बिन्नी ङो. रुट गो. स्टोक्स क्1, भुवनेश्वर कुमार, ङो. रुट, गो. अली, 58, ईशांत शर्मा त्रि. गो. ब्रॉड क्1, मोहम्मद नाबाद 51. अवांतर (1क्). एकूण 161 षटकांत सर्वबाद 457.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन 38-1क्-123-3, स्टुअर्ट ब्रॉड 33-13-53-2, बेन स्टोक्स 34-6-81-2, लिअम प्लंकेट 37-8-88-1, मोईन अली 18-क्-97-1, जो रुट 1-क्-6-क्.
इंग्लंड प. डाव :- अॅलिस्टर कुक त्रि. गो. शमी क्5, सॅम रॉबसन 2क्*, गॅरी बॅलन्स 15*. अवांतर (3). एकूण 1 बाद 43.
‘तो’ दिवस मुरलीचा होता
नॉटिंघम : मुरली विजय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटवेल याबद्दल शंका नव्हतीच; पण कठोर परिश्रमानंतरही कामगिरी आणि अपेक्षा यांचा ताळमेळ जमत नव्हता. मात्र, बुधवारचा दिवस मुरलीचा होता. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत अगदी पहिल्याच दिवशी परिश्रमपूर्वक खेळून विजयने शतक गाठलेच. या शतकी खेळीला उत्कृष्ट टायमिंग आणि तंत्रची जोड होती. त्याच्या खेळात आधीही या गोष्टी असायच्या; पण उणीव जाणवायची ती संयमाची. पण हा संयम त्याने येथे दाखवला, त्याचे सुंदर फळ त्याला शतकाच्या रूपाने मिळाले. विदेशात हे पहिलेच शतक होते.
तो म्हणाला, ‘संयम पाळण्याविषयी मी बरेच काम केले. खेळपट्टीवर कुठलीही घाई न करता चिकटून राहण्याचे शिकलो. प्रतिस्पर्धी खेळाडूंना थकविण्याचे डावपेच मोलाचे ठरतात. माङोही असेच ठरले होते.