शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे जय कवळी बीएफआयचे महासचिव

By admin | Updated: September 26, 2016 00:16 IST

भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अजयसिंह यांची अध्यक्ष आणि महासचिव म्हणून महाराष्ट्राचे जय कवळी यांची बहुमताने निवड झाल्यानंतर

मुंबई : भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अजयसिंह यांची अध्यक्ष आणि महासचिव म्हणून महाराष्ट्राचे जय कवळी यांची बहुमताने निवड झाल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या बॉक्सिंग संघातील वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.भारतीय मुष्टियुद्ध महासंघाच्या रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजयसिंह यांना ४९ मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी रोहित जैन यांना अवघी १५ मते मिळाली. मतदान आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ (एआयबीए) आणि क्रीडामंत्रालयाच्या निरीक्षकांच्या निरीक्षणाखाली झाले. एआयबीएचे प्रतिनिधित्व त्यांचे ओसनिया विभागाचे उपाध्यक्ष एडगर तानेर यांनी केले, तर क्रीडामंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या सुश्मिता ज्योत्सी यांना आपला निरीक्षक म्हणून पाठवले होते. उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करणारे ५१ वर्षीय अजयसिंह हे प्रसिद्ध उद्योगपती असून, ते उत्तराखंड मुष्टियुद्ध महासंघाचे उपाध्यक्षदेखील आहेत. अजयसिंह हे अखेरच्या क्षणी अध्यक्षपदाच्या शर्यतीत दाखल झाले आणि सूत्रांनुसार त्यांना भारतीय आॅलिम्पिक संघटनेचा पाठिंबादेखील होता. महाराष्ट्राचे जय कवळी यांची महासचिव म्हणून निवड झाली. त्यांना ४८ मते मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी लेनी डिगामा यांना अवघी १२ मते मिळाली. सचिवपदाच्या शर्यतीतील तिसरे उमेदवार हरियाणाचे राकेश ठाकरान यांना अवघी चारच मते मिळाली. आसामचे हेमंत कुमार कलिता यांची कोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. गेल्या आठवड्यात नामांकन प्रक्रिया संपली. त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी दाखल केली नव्हती.एआयबीएचे निरीक्षक तानेर यांनी निवड प्रक्रियेवर समाधान व्यक्त केले. भारतीय मुष्टियुद्ध महासंघाची कार्यकारिणी : अध्यक्ष : अजयसिंह, महासचिव : जय कवळी, कोषाध्यक्ष : हेमंत कुमार कलिता, उपाध्यक्ष : गोइबी सलामसिंह, जान खारशिंग, अनिल कुमार बोहिदार, सी.बी. राजे, अमरजितसिंह, नरेंद्र कुमार निर्वाण, राजेश भंडारी, अनिल कुमार मिश्रा, विभागीय सचिव : स्वप्न बॅनर्जी, जी.व्ही. रवी, आर. गोपू, राजेश देसाई, दिग्विजयसिंग, संतोष कुमार दत्ता, राजीवकुमार सिंह.