शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बंगाल वॉरियर्सची विजयाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: February 8, 2016 03:40 IST

नितीन तोमारच्या निर्णायक चढायांच्या जोरावर यजमान बंगाल वॉरियर्सने झुंजार पुणेरी पलटनला ३३-२८ असे नमवून प्रो- कबड्डीत सलग तिसरा विजय नोंदवला

रोहित नाईक, कोलकातानितीन तोमारच्या निर्णायक चढायांच्या जोरावर यजमान बंगाल वॉरियर्सने झुंजार पुणेरी पलटनला ३३-२८ असे नमवून प्रो- कबड्डीत सलग तिसरा विजय नोंदवला. यासह बंगालने घरच्या मैदानावर विजयी सलामी दिली. पुण्याचा तीन सामन्यांतून हा दुसरा पराभव ठरला.नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्याच्या पहिल्या सत्रात पुणेकारांचे वर्चस्व राहिले. जँग कून लीने बोनस गुणाद्वारे सामन्यातील पहिला गुण नोंदवताना यजमानांचे खाते उघडले. मध्यंतराला पुण्याने ११-१० अशी एका गुणाची नाममात्र आघाडी घेतली. कर्णधार मनजित चिल्लरने अप्रतिम सुपर टॅकल करताना पुण्यावरील लोणचे संकट तब्बल तीन वेळा दूर केले.दुसऱ्या सत्रात मात्र यजमानांनी तुफान आक्रमण करत २२व्या मिनिटाला पुण्यावर लोण चढवला. ३०व्या मिनिटाला पुन्हा एकदा लोणचे संकट असताना चिल्लरने भन्नाट सुपर रेड करून पुण्याला २४-२२ आघाडीवर नेले. मात्र बंगालच्या नितीन तोमारने निर्णायक चढाई करताना यजमानांना बरोबरी साधून दिली आणि त्यानंतर ३७व्या मिनिटाला चिल्लर, दीपक हुडा व जसमीर सिंग यांना बाद करून बंगालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तोमारने एकूण ११ गुणांची वसुली केली. पुण्याकडून चिल्लरने १३ गुण मिळवत एकाकी झुंज दिली.