ऑनलाइन टीमरिओ दे जोनेरिओ, दि. २३ - फिफा २०१४ ग्रुप एच मध्ये बेल्जियम विरुद्ध रशिया लढतीत बेल्जियमने रशियावर १-० अशी मात केली. खेळाच्या पहिल्या भागात कोणालाही गोल करता आला नाही. त्यामुळे प्रेक्षकांत फारसा उत्साह नव्हता. ८८ व्या मिनिटाला हॅझार्ड ओरीगी या बेल्जियमच्या खेळाडूने गोल केल्यावर बेल्जियमच्या प्रेक्षकांनी मॅरॅकॅना स्टॅडियम डोक्यावर घेतले. रशियाच्या खेळाडूंनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना गोल करता आला नाही. दुस-या भागातील ८८ व्या मिनिटाला झालेल्या गोल ने रशियाकडे गोल करण्यास वेळ अत्यंत कमी होता. त्यातच त्यांना अतिरिक्त वेळेत गोल करता आला नाही. आणि साहाजीकच बेल्जियम चा संघ विजयी होत दुस-या फेरीकरता पात्र ठरला आहे.
बेल्जियमची रशियावर १-० ने मात
By admin | Updated: June 23, 2014 06:04 IST