शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

बेल्जियम बाद फेरीत

By admin | Updated: June 23, 2014 04:56 IST

युवा फॉरवर्ड डिव्होक ओरिजीने प्रशिक्षक मार्क व्हिलमोट््सचा दुसऱ्या सत्रात मैदानात उतरविण्याचा निर्णय सार्थ ठरवित ८८ व्या मिनिटाला गोल नोंदविला.

रिओ दि जनेरिओ : युवा फॉरवर्ड डिव्होक ओरिजीने प्रशिक्षक मार्क व्हिलमोट््सचा दुसऱ्या सत्रात मैदानात उतरविण्याचा निर्णय सार्थ ठरवित ८८ व्या मिनिटाला गोल नोंदविला. ओरिजीचा गोल निर्णायक ठरला आणि बेल्जियमने रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रशियाचा १-० ने पराभव करीत फिफा विश्वकप स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश निश्चित केला. ही लढत रशियाचे प्रशिक्षक फॅबियो कापेलो यांनी गाजविली, पण अखेर बेल्जियमने सरशी साधली. या विजयासह बेल्जियमने दोन सामन्यांत ६ गुणांची कमाई करीत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. रशियाला आता बाद फेरी गाठण्यासाठी अल्जेरियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवावा लागेल आणि अन्य सामन्यांचे निकाल अनुकुल ठरतील यासाठी ईश्वराची प्रार्थना करावी लागेल. ‘रेड डेव्हिल्स’ बेल्जियम संघासाठी प्रशिक्षक फॅबियो कापेलो यांच्या रशियन संघाचा बचाव भेदणे अडचणीचे ठरत होते, पण अखेर बेल्जियमने सरशी साधली. निर्धारित वेळेच्या दोन मिनिटांपूर्वी मिडफिल्डर इडेन हजार्डच्या मदतीने ओरिजीने शानदार गोल नोंदवित संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. १९ वर्षीय ओरिजी बेल्जियमतर्फे विश्वकप स्पर्धेत गोल नोंदविणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला तर स्पर्धेच्या इतिहासात अंतिम क्षणी गोल नोंदविणारा सातवा युवा फुटबॉलपटू ठरला. बेल्जियमने सलामी लढतीत अल्जेरियाचा २-१ ने पराभव केला होता. (वृत्तसंस्था)