शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निर्भय असा, पण निष्काळजी नको

By admin | Updated: June 18, 2017 03:13 IST

क्रिकेटचा मोठा इतिहासात लाभलेल्या दोन परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत भिन्न

- सौरव गांगुली लिहितात...क्रिकेटचा मोठा इतिहासात लाभलेल्या दोन परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत भिन्न दृष्टिकोन राखून सहभागी झाले होते. गतविजेता भारतीय संघ जेतेपद राखण्याचा प्रबळ दावेदार होता. याउलट पाकिस्तान मात्र ‘ब’ गटात सहभागी अन्य एक संघ होता. स्पर्धेसाठी पात्रता मिळवणे त्यांच्यासाठी मोठी बाब होती. त्यामुळे रविवारी दावेदार संघाची ‘डार्क हॉर्स’ संघांसोबत गाठ पडणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूंनाही पाक संघाकडून अंतिम फेरीची अपेक्षा नव्हती. देशभक्त नागरिकांप्रमाणे त्यांनाही पाक संघाने चांगली कामगिरी करावी, असे वाटत होते. पण, सलामी लढतीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाक संघातील तळागाळातील चाहत्याचाही संघावरील विश्वास ढासळला होता. त्यानंतर मात्र प्रत्येक लढतीगणिक पाक संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा होत गेली. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पाक संघाच्या कामगिरीचा आलेख उंचावत गेला. त्यांच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर इंग्लंडविरुद्ध त्यांनी क्षेत्ररक्षणातही कमाल केली. युवा हसनने जुनेद व आमिरच्या साथीने छाप सोडली. आमिरच्या स्थानी इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळलेल्या रईसनेही मिळालेल्या संधीचे सोने केले. सामन्यागणिक सरफराजने कर्णधार म्हणून परिपक्व होत असल्याचे दाखविले. पाक संघासाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांची फलंदाजी आहे. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, यात वाद नाही. त्यांच्यात प्रतिभा आहे, पण केवळ याच एकमेव विभागात पाक संघ भारताच्या तुलनेत थोडा पिछाडीवर आहे. पाकिस्तान संघ भारताविरुद्ध नेहमीच आक्रमक खेळतो, पण प्रतिष्ठेच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळाच्या प्रत्येक विभागात सातत्य राखणे महत्त्वाचे ठरते.प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवित अंतिम फेरीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या संघाविरुद्ध त्यांची लढत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीचा ‘वाईट दिवस’ वगळता भारतीय संघाची या स्पर्धेतील वाटचाल शानदार ठरली आहे. विविधतेच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिलेली नाही. प्रतिस्पर्धी संघाची भागीदारी बहरत असताना चमकदार क्षेत्ररक्षण किंवा कामचलाऊ गोलंदाज कर्णधारचा विश्वास सार्थ ठरवित आहेत. प्रतिस्पर्धी संघाला बुचकाळ्यात टाकणारे निर्णय घेत कर्णधार विराट कोहलीने आपले वेगळेपण जपले आहे. खेळावर नियंत्रण राखण्यात तो यशस्वी ठरला आहे. फलंदाजीमध्ये भारतीय संघ वरचढ आहे. रविवारीच्या लढतीत उभय संघातील खेळाडूंसाठी मनोधैर्य कायम राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ पाकवर वर्चस्व गाजवित आहे. पाक संघावर कुठलेही दडपण नसेल. कारण पराभव झाला तरी ‘खेळाडूंनी चांगली कामगिरी केली’ असेच म्हटले जाईल. निर्भय असा, पण निष्काळजी नको. (गेमप्लॅन)