शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींच्या निवडीचं वृत्त बीसीसीआयने फेटाळलं

By admin | Updated: July 11, 2017 19:37 IST

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर माजी संघसंचालक रवी शास्त्री यांची निवड करण्यात आल्याचं वृत्त बीसीसीआयनं खोडून काढलं...

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर माजी संघसंचालक रवी शास्त्री यांची निवड करण्यात आल्याचं वृत्त  बीसीसीआयनं खोडून काढलं आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी पत्रकारपरिषदेद्वारे याचे स्पष्टीकरण दिलं आहे. बीसीसीआयनं केलेल्या या खुल्याशामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे. अमिताभ चौधरी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की, प्रशिक्षकपदावर आणखी मोहर लागली नाही. माध्यमातील आलेलं वृत्त खोट आहे. पण आज भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात येणारा प्रशिक्षक आगामी श्रीलंका दौऱ्यापासून ते जबाबदारी स्वीकारणार आहे. आगामी 2019 च्या वर्ल्ड कपपर्यंत त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी असेल.

काल मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्यांनी प्रशिक्षकपदाच्या मुलाखती घेतल्या होत्या. यात रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांच्या समावश होता. सहावा उमेदवार फील सिमन्स अनुपस्थित राहिला. विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते.

काल पत्रकार परिषदेत गांगुलीने आम्हाला आणखी वेळ हवा आहे. कोहलीशी चर्चा केल्यानंतरच प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र आज सकाळी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या(बीसीसीआय) संचालन समितीचीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सीएसी समितीला आज संध्यकाळी प्रशिक्षकची निवड करण्याचे आदेश दिले होते. क्रिकेट सल्लागार समिती म्हणजे सीएसीमध्ये सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या त्रीमुर्तींचा समावेश आहे.