शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

केकेआर-सनराइजर्स यांच्यात वर्चस्वाची लढाई

By admin | Updated: April 15, 2017 04:31 IST

आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स वर्चस्वाच्या लढाईत आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये सनराइजर्स हैदराबादला धूळ चारण्याच्या इराद्याने उतरणार

कोलकाता : आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स वर्चस्वाच्या लढाईत आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये सनराइजर्स हैदराबादला धूळ चारण्याच्या इराद्याने उतरणार आहे. हा सामना म्हणजे गोलंदाजांना श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी असेल शिवाय केकेआरला मागच्या सत्रातील एलिमिनेटरमधील पराभवाची परतफेड देखील करायची आहे.एक विजय आणि एका पराभवासह वाटचाल करणाऱ्या दोनवेळेच्या विजेत्या केकेआरने काल रात्री ईडन गार्डनवर किंग्स इलेव्हन पंजाबला २१ चेंडू शिल्लक राखून आठ गड्यांनी पराभूत केले. घरच्या मैदानावर संघाचा हा सलग ११ वा विजय होता. कर्णधार गौतम गंभीरने या सामन्यात सुनील नारायणला सलामीला खेळविण्याचा ‘मास्टर स्ट्रोक’ खेळला. दोघांनी ‘पॉवर प्ले’मध्ये ७६ धावा कुटल्या. नारायणने १८ चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांसह ३७ धावांचे योगदान दिले. ईडनच्या खेळपट्टीवर उमेश यादवने चार गडी बाद केले.सनराइजर्सकडेही भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांच्या रूपात उत्कृष्ट वेगवान आणि फिरकी गोलंदाज आहेत. राशिदने तीन सामन्यात १३ गडी बाद केले तर पर्पल कॅपवर हक्क गाजवित असलेल्या भुवनेश्वरने निर्णायक षटकांत शानदार मारा केला. त्याच्या सोबतीला आशिष नेहरा आणि मुस्तफिजूर रहमान हे आहेतच. केकेआरचा सनराइजर्सविरुद्ध जय पराजयाचा रेकॉर्ड ६-३ असा आहे. पण याआधीच्या सामन्यात सनराइजर्सने सरशी साधली हे विशेष.(वृत्तसंस्था)