शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

आॅस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यात वर्चस्वाची लढाई

By admin | Updated: March 8, 2015 01:39 IST

विश्वचषकाच्या ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर कोण राहणार, यासाठी आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंका उद्या (रविवारी) ‘दोन हात’ करण्यास उतरणार आहेत.

सिडनी : विश्वचषकाच्या ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानावर कोण राहणार, यासाठी आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंका उद्या (रविवारी) ‘दोन हात’ करण्यास उतरणार आहेत. या गटात न्यूझीलंड अव्वल स्थानावर राहील, हे जवळपास पक्के आहे. आॅस्ट्रेलिया आणि १९९६ चा विजेता श्रीलंका यांच्यापैकी ज्यांची सरशी होईल तो संघ क्वार्टर फायनलमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध खेळणार नाही. श्रीलंकेने चारपैकी तीन सामने जिंकले. संघाला सहा गुण असून, आॅस्ट्रेलियाच्या तुलनेत एक गुण जास्त आहे. मायकेल क्लार्कच्या आॅस्ट्रेलियाने मागील सामन्यात अफगाणिस्तानला २७५ धावांनी लोळविले होते. श्रीलंकेचा संघ फॉर्ममध्ये आहे. मागच्या सामन्यात वेलिंग्टन येथे ३१० धावांचा पाठलाग करीत इंग्लंडला ४७.२ षटकांत लक्ष्य गाठून नऊ गड्यांनी पराभूत केले होते. इंग्लंडविरुद्ध शतकी झंझावात करणारे लाहिरु थिरिमाने आणि कुमार संगकारा हे सर्वाधिक धावा काढणाऱ्या दहा फलंदाजांच्या पंक्तीत आहेत. उद्याच्या सामन्यात लंकेला दुखापतग्रस्त फिरकी गोलंदाज रंगना हेरथ याच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. याशिवाय सरावादरम्यान बोटाला इजा झाल्याने फलंदाज दिमूथ करुणारत्ने स्पर्धेबाहेर पडला आहे.आॅस्ट्रेलियाचा बांगलादेशविरुद्धचा पावसात वाहून गेलेला सामना तसेच न्यूझीलंडकडून एका गड्याने पत्करावा लागलेला पराभव महागडा ठरू शकतो. याशिवाय सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांत चौथ्या स्थानावर असलेला मिशेल स्टार्क याच्या नेतृत्वात वेगवान माऱ्याचे आव्हान लंकेच्या फलंदाजांपुढे असेल. कमरेचे दुखणे उसळल्याने पॅट कमिन्स हा दुसरा वेगवान गोलंदाज खेळू शकणार नाही. (वृत्तसंस्था) हेड टू हेडया दोन्ही संघामध्ये आत्तापर्यंत ६८ सामने झाले असून आॅस्ट्रेलियाने ४६ तर श्रीलंकेने २० लढती जिंकल्या आहेत. दोन सामन्यांचे निकाल लागू शकले नाही.विश्वचषकात हे दोन्ही संघ ९ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. आॅस्ट्रेलियाने ६ वेळा तर श्रीलंकेने २ वेळा विजय नोंदविला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहीरू थिरीमने (उपकर्णधार), दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेरथ, महेला जयवर्धने, दिमुथ करूणारत्ने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, धम्मिका प्रसाद, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), सचिथ्रा सेनानायके.आॅस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पॅट क्युमिन्स, झेव्हिएर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अ‍ॅरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), जोश हेजलवुड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हीड वॉर्नर, शेन वॉटसन.