शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजी हीच निर्णायक बाब ठरेल!

By admin | Updated: March 19, 2016 01:58 IST

कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले

- सौरव गांगुली लिहितो़...कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले असतील. क्रिकेटच्या प्रत्येक हालचालींचा मिनिटा मिनिटाला मिळणारा आनंद फार मोठा असतो. क्रिकेटपटू या नात्याने मी भारत-पाक लढतीचा प्रत्यक्ष साक्षीदार राहिलो. आता आयोजक या नात्याने नवी जबाबदारी आव्हानात्मक आहे.पहिला सामना भारताने गमविल्यामुळे चाहते फारच दडपणात आहेत; पण एक सांगू का, दडपणातून मार्ग काढणारा आणि मुसंडी मारणारा जर कुठला संघ असेल तर तो भारतच आहे. ११ पैकी १० सामने भारताने सलग जिंकले हे विसरू शकत नाही.ईडनची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे. अनेक भारतीय खेळाडू या खेळपट्टीवर मोठी खेळी करू शकतील, अशी अपेक्षा करता येईल. या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत असल्याने ती वेगवान माऱ्यालादेखील मदत करेल पण फिरकी गोलंदाजांनी चेंडूचा टप्पा अचूक ठेवल्यास फलंदाजांना ते त्रस्त करू शकतील. मैदानाचे आऊटफिल्डही वेगवान आहे. क्षेत्ररक्षकांच्या हातून चेंडू निसटल्यास तो थेट सीमारेषेवरच जाऊन विसावतो. खेळपट्टीचे स्वरूप संपूर्ण ४० षटके एकसारखे राहणार असल्याने नाणेफेक कुणीही जिंको फारसा फरक पडणार नाही.ईडनवर पाकने बांगलादेशला नमविल्याने त्यांचे पारडे या सामन्यात किंचित जड आहे. पण, याचा अर्थ असा नव्हे की भारताविरुद्ध त्यांची बाजू भक्कम ठरावी. शनिवारचा दिवस नवा असेल आणि एका बलाढ्य फलंदाजी असलेल्या संघाविरुद्ध ते खेळणार आहेत. पाकची गोलंदाजी धारदार आहे, पण फलंदाजी मात्र चिंतेचा विषय राहीलच. या सामन्यात फलंदाजी हीच दोन्ही संघांसाठी निर्णायक बाब ठरेल, असे माझे मत आहे.दोन्ही संघ आजच्या लढतीसाठी फारसे बदल करतील असे वाटत नाही. भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळलेला संघ कायम ठेवेल. बांगलादेशवर विजय मिळविणाऱ्या पाक संघात चांगला समन्वय होता. यात अधिक बदलाची आणि प्रयोगाची गरज असेल असे वाटत नाही. भारत-पाक सामना हा धर्मयुद्धासारखा असतो. सामन्यादरम्यान अनेकांचा श्वास रोखला जावा, अशा घटना घडतात. चाहत्यांच्या प्रतिसादामुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचा संचार होतो. या लढतीत राष्ट्रीयत्व हा देखील प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. कुणाविरुद्धही हरलात तरी चालेल, पण पाककडून पराभव नको अशी चाहत्यांची भावना असते. ईडनवर सामना असेल तर ६६ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीचे दडपणही यजमान संघावर असेलच. ईडनवरील पाकच्या विजयाची फारच चर्चा रंगली आहे. येथे पाक संघ भारताविरुद्ध एकाही सामन्यात हरलेला नाही; पण येथे हेदेखील ध्यानात घ्यायला हवे की भारताने विश्वचषकात पाकविरुद्ध एकही सामना गमविलेला नाही. (गेमप्लान)