शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाज, गोलंदाजांना तयारीची संधी

By admin | Updated: July 14, 2016 03:01 IST

वेस्ट इंडीज बोर्ड इलेव्हनविरुद्ध टीम इंडियाचा तीन दिवसीय दुसरा सराव सामना उद्या (गुरुवार)पासून सुरू होत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ यानिमित्ताने सज्ज होणार आहे

बासेटेरे : वेस्ट इंडीज बोर्ड इलेव्हनविरुद्ध टीम इंडियाचा तीन दिवसीय दुसरा सराव सामना उद्या (गुरुवार)पासून सुरू होत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ यानिमित्ताने सज्ज होणार आहे. फलंदाज आणि गोलंदाजांना या लढतीत हात अजमावण्याची मोठी संधी असेल. १२ जुलैपासून पहिल्या कसोटीला प्रारंभ होईल. त्याआधी अंतिम इलेव्हनमध्ये कुणाला संधी द्यावी, हे तपासून पाहण्यासाठी या लढतीकडे संघ व्यवस्थापन लक्ष देणार आहे. दोन दिवसांच्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडू प्रभावी कामगिरी करू शकले नव्हते. त्यामुळे मार्गदर्शक अनिल कुंबळे दुसऱ्या सराव लढतीकडे गांभीर्याने पाहात आहेत. जखमेतून सावरलेला मोहंमद शमी व भुवनेश्वर कुमार यांनी सुरुवात चांगली केली; पण लय कायम राखण्यात दोघांनाही अपयश आले. ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांनादेखील कामगिरीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. मुंबईचा शार्दूल ठाकूर यालादेखील पदार्पणाचे वेध लागले आहेत. लेगस्पिनर अमित मिश्रा याने ४ बळी घेऊन सर्वांना चकित केले होते. आश्विन आणि जडेजा यांच्या तुलनेत मिश्राला स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. फलंदाजीत भारताची आघाडीची फळी भक्कम वाटते. राहुल आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी खेळी केली. चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनीदेखील धावा काढल्या; पण कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना फलंदाजीचा पुरेसा सराव मिळाला नव्हता. (वृत्तसंस्था)सेंट किट्स : विंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंनी व्यस्ततेतून वेळ काढून सागरकिनाऱ्यावर मौजमजा केली. कोच कुंबळे आणि कर्णधार कोहली यांच्यासह सर्वच खेळाडू मंगळवारी सेंट किट्स तसेच नेव्हिस बीचवर दाखल झाले होते. खेळाडूंनी तेथे घालविलेले मौजमजेचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विराट, धवन, चेतेश्वर पुजारा आणि जडेजा हा आंनद साजरा करताना दिसत आहेत. कुंबळे खेळाडूंसोबत मित्राप्रमाणे वागत असले, तरी त्यांनी आचारसंहितादेखील लावली आहे.टेलरच्या जागी कमिन्ससेंट किट्स : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या जेरोम टेलरच्या जागी वेगवान गोलंदाज मिगुएल कमिन्स याला आगामी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. २५ वर्षांच्या कमिन्सने ४१ प्रथमश्रेणी सामन्यात ११६ बळी घेतले आहेत. यंदा आॅस्ट्रेलियाचा दौरा करणाऱ्या विंडीज संघात त्याचा समावेश होता; पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.

उभय संघभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी. वेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष इलेव्हन : लियोन जॉन्सन (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, राजेंद्र चंद्रिका, रोस्टन चेस, जॉसन डावेस, शेन डारिच, शाय होप, डोमियन जेकब्स, कियोन जोसेफ, मार्किनो मायंडले, विशालसिंग, जोमेल वारिकन.