बास्केटबॉल १
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST
या ज्येष्ठ संघटकांनी महाविद्यालयीन खेळाडूंचा प्रतिसाद कमी असल्याचीही खंत व्यक्त केली. महाविद्यालयीन पातळीवर खेळाडूंचा प्रतिसाद फारच कमी आहे. शालेय स्पर्धेत ५0 पेक्षा जास्त संघ सहभागी होतात; परंतु आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कसेबसे आठच संघ सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले. मनजित आणि कड यांनी बास्केटबॉल खेळाला मीडिया आणि स्पॉन्सर्सचे पाठबळ महत्त्वाचे असल्याचे म्हटले. कोणताही खेळ मीडियाच्या पाठबळाशिवाय लोकप्रिय होऊ शकत नाही. लोकमत समूहातर्फे स्थानिक खेळाडूंना नेहमीच पाठबळ असते. युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठाची गरज असते आणि लोकमत समूहाने औरंगाबाद स्पोर्टस् फेस्टिव्हलचे आयोजन करून खेळाडूंना आवश्यक असलेले व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळून त्यांचा आत्मविश्वासही उंचावला आहे. याशिवाय आम्हाला आमच्या प्रतिभावान ब
बास्केटबॉल १
या ज्येष्ठ संघटकांनी महाविद्यालयीन खेळाडूंचा प्रतिसाद कमी असल्याचीही खंत व्यक्त केली. महाविद्यालयीन पातळीवर खेळाडूंचा प्रतिसाद फारच कमी आहे. शालेय स्पर्धेत ५0 पेक्षा जास्त संघ सहभागी होतात; परंतु आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कसेबसे आठच संघ सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले. मनजित आणि कड यांनी बास्केटबॉल खेळाला मीडिया आणि स्पॉन्सर्सचे पाठबळ महत्त्वाचे असल्याचे म्हटले. कोणताही खेळ मीडियाच्या पाठबळाशिवाय लोकप्रिय होऊ शकत नाही. लोकमत समूहातर्फे स्थानिक खेळाडूंना नेहमीच पाठबळ असते. युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठाची गरज असते आणि लोकमत समूहाने औरंगाबाद स्पोर्टस् फेस्टिव्हलचे आयोजन करून खेळाडूंना आवश्यक असलेले व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळून त्यांचा आत्मविश्वासही उंचावला आहे. याशिवाय आम्हाला आमच्या प्रतिभावान बास्केटबॉलपटूंसाठी स्पॉन्सर्सचीही गरज आहे, असे त्यांना वाटते. औरंगाबादेत ऑक्टोबर महिन्यात होणार्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशाही या बास्केटबॉल संघटकांना वाटते. ते म्हणाले, शहरात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. त्यात अनिरुद्ध पांडे, अवनी देशमुख, स्नेहजित कौर दरोगा, विद्या गुजराती, मयुरी बोरुडे, नवेली देशमुख आणि तन्वी पारेख यांचा समावेश आहे. आगामी स्पर्धेत नवीन गुणवत्ता पुढे येईल अशी आम्हाला आशा आहे. बास्केटबॉल संघटनेसमोर कठीण आव्हान आहे; परंतु या आकर्षक आणि वेगवान खेळाकडे ते आणखी नवीन चाहते मिळवतील अशी आशा आहे. या प्रसंगी मनजितसिंग दरोगा व गणेश कड यांच्यासह संदीप ढंगारे, सय्यद रफिक, रौनकसिंग, मीनाक्षी मुलिया, प्रशांत बुरांडे, शिवाजी शिंदे, विजय पिंपळे आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)