शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशची श्रीलंकेवर २३ धावांनी मात

By admin | Updated: February 28, 2016 23:48 IST

गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या बळावर बांगलादेशने आशिया कप टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत आज येथे श्रीलंकेवर २३ धावांनी विजय मिळवताना आपल्या आशा जिवंत ठेवल्या

मीरपूर : शब्बीर रहमान याची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या बळावर बांगलादेशने आशिया कप टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत आज येथे श्रीलंकेवर २३ धावांनी विजय मिळवताना आपल्या आशा जिवंत ठेवल्या.बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला ८ बाद १२४ पर्यंतच मजल मारता आली. त्याचबरोबर श्रीलंकेला स्पर्धेत पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली. बांगलादेशचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय आहे. श्रीलंकेकडून दिनेश चांदीमल याने सर्वाधिक ३७ धावा केल्या. बांगलादेशकडून अल अमीन हुसैन याने ३४ धावांत ३ गडी बाद केले. शाकीबने २१ धावांत २ बळी घेतले. मुस्तफिजूर रहमान याने हाणामारीच्या षटकात शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत फक्त १९ धावा देताना १ गडी बाद केला.त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने २0 षटकांत ७ बाद १४७ धावा केल्या. बांगलादेशकडून शब्बीर रहमान याने सर्वाधिक ५४ चेंडूंत १0 चौकार आणि ३ षटकारांसह ८0 धावा केल्या. तसेच, त्याने शाकीबसोबत चौथ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी करताना बांगलादेशला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शकीब अल हसन याने ३४ चेंडूंत ३ चौकारांसह ३२ धावांची खेळी केली. दोन्ही जम बसलेले फलंदाज परतल्यानंतर महमुदुल्लाहने १२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद २३ धावांची वेगवान खेळी केली. श्रीलंकेकडून दुशमंता चमीराने ३0 धावांत ३ गडी बाद केले.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर मोहंमद मिथुन आणि सौम्या सरकार पहिल्या दोन षटकांतच तंबूत परतले. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. मुशफिकर रहीमदेखील ४ धावा काढून धावबाद झाला. त्यामुळे त्यांची धावसंख्या ३ बाद २६ अशी झाली. तथापि, शब्बीरने दुसऱ्या एंडकडून धावा काढण्याचा सपाटा सुरू ठेवला. बांगलादेशच्या डावाच्या पहिल्या १६ षटकांत शब्बीरच्या रूपाने ‘वन मॅन शो’ पाहायला मिळाला. बांगलादेशच्या पहिल्या तीन षटकांत ६ धावाच झाल्या होत्या; परंतु डावाच्या चौथ्या षटकात शब्बीरने नुवान कुलसेखरच्या पहिल्या चार चेंडूंत ३ चौकार आणि एक षटकार ठोकताना प्रेक्षकांना रोमांचित केले. त्यानंतर पहिला बदलाच्या रूपात आलेल्या परेराचेही त्याने तीन चौकार मारून स्वागत केले. दुसरीकडे शाकिबला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला; परंतु शब्बीरने शेहान जयसूर्याला षटकार ठोकताना टी-२0 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने या गोलंदाजाच्या पुढील दोन चेंडूंवर चौकारही ठोकले. चमीराच्या गोलंदाजीवर षटकार ठोकल्यानंतर तो डीप मिडविकेटला झेल देऊन बाद झाला. चमीराने पुढच्या षटकात शाकिबला यष्टिपाठीमागे झेलबाद केले.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : २0 षटकांत ७ बाद १४७. (शब्बीर रहमान ८0, शकीब अल हसन ३२, महमुदुल्लाह नाबाद २३. डी. चमिरा ३/३0, अँजलो मॅथ्यूज १/८, नुवान कुलसेखरा १/४४).श्रीलंका : २0 षटकांत ८ बाद १२४.(दिनेश चांदीमल ३७, जेहान जयसूर्या २६. अल अमीन हुसैन ३/३४, मुस्तफिजूर रहमान १/१९, शकीब अल हसन २/२१, मोर्तझा १/१७).