शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

२००७ च्या वर्ल्डकपमधून बाहेर होणे वाईट क्षण

By admin | Updated: December 31, 2014 23:41 IST

वेस्ट इंडीजमध्ये २००७ मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियावर लवकरच बाहेर होण्याची नामुष्की ओढवली होती़ हा क्रिकेट कारकीर्दीतील सर्वांत वाईट क्षण होता,

सचिन तेंडुलकर : २०११मध्ये चांगल्या कामगिरीसाठी मिळाली प्रेरणादुबई : वेस्ट इंडीजमध्ये २००७ मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियावर लवकरच बाहेर होण्याची नामुष्की ओढवली होती़ हा क्रिकेट कारकीर्दीतील सर्वांत वाईट क्षण होता, असे मत महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे़आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये २०१५ मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) लिहिलेल्या कॉलममध्ये सचिनने म्हटले की, विंडीजमधील वर्ल्डकपमध्ये आम्हाला लवकरच बाहेर व्हावे लागले होते़ यानंतर संघाला चोहोबाजूंनी टीकेचा सामना करावा लागला होता; मात्र या निराशाजनक कामगिरीमुळे आम्हाला २०११मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळाली, असेही सचिन म्हणाला़सचिन पुढे म्हणाला, विंडीजमध्ये पराभव झाल्यानंतर भारतातील २०११ चा वर्ल्डकप जिंकावा असे माझे स्वप्न होते़ ते पूर्ण झाल्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही़ या स्पर्धेत आॅस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या अनुभवी संघांना धूळ चारून जेतेपदावर नाव कोरले़ हा क्षण माझ्यासाठी विशेष होता़ कारण तब्बल २८ वर्षांनी भारताला हे अजिंक्यपद मिळाले होते़ २५ जून १९८३ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला तेव्हा मी अवघ्या १० वर्षांचा होतो़ तेव्हा संघातील खेळाडूंचा हातात ट्रॉफी घेतलेला फोटो पूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला होता़ विशेष म्हणजे तेव्हा वडिलांनी मला पूर्ण रात्रभर आनंद साजरा करण्याची परवानगी दिली होती़ भारत आणि पाकिस्तानात १९८७ ला झालेल्या वर्ल्डकपमध्ये मी बॉलबॉयची भूमिका निभावली होती़ तेव्हाच भारतीय संघाकडून खेळण्याचे मी स्वप्न बघितले होते, असेही सचिनने या कॉलममध्ये नमूद केले़ सचिन पुढे म्हणाला, १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध मी बाद झाल्यानंतर खेळाडू एकापाठोपाठ एक बाद झाले आणि संघाला पराभवाची नामुष्की ओढवली होती़ संघाला गरज असताना बाद झाल्याचा मला आजही खेद वाटतो़ १९९९चा वर्ल्डकप तर माझी परीक्षा बघणारा ठरला़ कारण याच वर्ल्डकपदरम्यान वडिलांचे निधन झाले होते, असेही सचिनने सांगितले़