शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बी. साई प्रणीतचा विजय

By admin | Updated: March 11, 2016 03:39 IST

युवा खेळाडू बी. साई प्रणीत याने आपल्या कारकिर्दीमधील सर्वांत सनसनाटी निकाल नोंदवताना प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत मलेशियाच्या जागतिक क्रमवारीतील

बर्मिंगहॅम : युवा खेळाडू बी. साई प्रणीत याने आपल्या कारकिर्दीमधील सर्वांत सनसनाटी निकाल नोंदवताना प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत मलेशियाच्या जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू ली चोंग वेईला धक्का दिला. दोन वेळा आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या चोंग वेईला प्रणीतने ५० मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात २४-२२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवून खळबळ माजवली. स्पर्धेत दुसरे मानांकन असलेल्या चोंग वेईने तब्बल ३ वेळा ही स्पर्धा जिंकली असून, या वेळीदेखील त्याची गणना प्रबळ विजेत्यांमध्ये होती. मात्र, प्रणीतने अनपेक्षित विजय मिळवताना सर्व चित्रंच बदलले. चुरशीच्या झालेल्या पहिल्या सेटमध्ये अंतिम क्षणी खेळ उंचावून निर्णायक आघाडी घेतलेल्या प्रणीतला दुसऱ्या सेटमध्येही कसलेल्या चोंग वेईकडून कडवी झुंज मिळाली. या वेळी प्रणीतने काही उत्कृष्ट स्मॅश मारताना नेटजवळ वेगवान खेळ करून चोंग वेईला दडपणाखाली ठेवले.पुढील फेरीत प्रणीतचा सामना जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या हैन्स क्रिस्टीन विटींगस (डेन्मार्क)विरुद्ध होईल. याआधी २०१३मध्ये फ्रेंच ओपनमध्ये हैन्सविरुद्ध पराभूत झाल्याने प्रणीतचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे प्रणीतवर या सामन्यत काहीसे दडपण असेल. मात्र चोंग वेईविरुद्ध प्रणीतने केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे हैन्सला गाफील राहणे महागात पडू शकते.प्रणीतने एका बाजूला शानदार विजय नोंदवल्यानंतर दुसऱ्या बाजूला ‘फुलराणी’ सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंसह समीर वर्मानेही विजयी सलामी दिली. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सायनाच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष होते. सायनाने दुसऱ्या फेरीत थायलंडच्या बुसान ओंगबुमरंगफानचा २१-१६, २१-९ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला़ तत्पूर्वी तिने कॅनडाची राष्ट्रकुलविजेती मिशेल ली हिला २१-१७, २१-१२ असे लोळवले.