शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

एचसीए अध्यक्षपदासाठी अझहरुद्दीनचा अर्ज

By admin | Updated: January 11, 2017 01:35 IST

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने मंगळवारी हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या (एचसीए) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.

हैदराबाद : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने मंगळवारी हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या (एचसीए) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यापूर्वी अर्शद अयूबने लोढा समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सलग तीन विश्वकप स्पर्धेत (१९९२, १९९६ व १९९९) भारताचे नेतृत्व करणारा आणि भारताचे सर्वांत अधिक वेळ कर्णधारपद भूषविणाऱ्यांपैकी एक असलेल्या अझहरुद्दीनवर वर्ष २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात समावेश असल्याचा ठपका ठेवत बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. अझहरुद्दीनने अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले की, ‘हैदराबादचे क्रिकेटवर लक्ष नाही. रणजी ट्रॉफीमध्ये आम्ही तळातून दुसऱ्या स्थानी आहोत. हैदराबादमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट बहरावे, असे मला वाटते.’अझहरुद्दीनने प्रदीर्घ काळ कायद्याची लढाई लढली आणि २०११ मध्ये आंध्र उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निर्णय दिला, पण बीसीसीआयने अद्याप त्याच्यावरील आजीवन बंदीचा निर्णय अधिकृतपणे रद्द केलेला नाही. माजी खेळाडूंना मिळणारे पेन्शन (निवृत्ती मानधन) त्याला अद्याप मिळालेले नाही. गेल्या रणजी मोसमात अझहरुद्दीन सीमारेषेबाहेर विदर्भाच्या खेळाडूंसोबत चर्चा करताना दिसला. त्यावर आक्षेप घेतना बीसीसीआयने डीडीसीएला पत्र लिहिले होते. सामनाधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेतली होती. (वृत्तसंस्था)एचसीएचे सचिव जॉन मनोज यांनी सांगितले की,‘अझहर आपल्या समर्थकांसह एचसीएच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आला होता, असे मला कळविण्यात आले. त्याच्याकडे निवडणूक लढविण्यास पात्र असल्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश होता. साधारणपणे एचसीएची निवडणूक मे महिन्याच्या अखेरच्या रविवारी होते, पण अझहरकडे निवडणूक १७ जानेवारीला व्हावी, असा आदेश होता.’ आपल्या उमेदीच्या काळात सर्वोत्तम शैलीदार फलंदाजांपैकी एक असलेल्या अझहरने भारतातर्फे ९९ कसोटी सामन्यांत २४ शतके ठोकली आणि ६००० पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)