शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव

By admin | Updated: August 9, 2015 01:09 IST

वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि बेन स्टोक्स यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने आज संपलेल्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा १ डाव ७८ धावांनी पराभव

नॉटिंगहॅम : वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि बेन स्टोक्स यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने आज संपलेल्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा १ डाव ७८ धावांनी पराभव केला आणि शाही विजयासह इंग्लंडने अ‍ॅशेस करंडकावर पुन्हा एकदा नाव कोरले. कालच्या ७ बाद २४१ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव आज केवळ ४० मिनिटांमध्ये संपुष्टात आला. डावाने पराभव टाळण्यासाठी आॅस्ट्रेलियाला ९० धावांची गरज होती. अष्टपैलू स्टोक्सने ३६ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज वुडने नॅथन लियोनला बाद करून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह अ‍ॅलिस्टर कुकच्या नेतृत्वाखालील संघाने चार सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. इंग्लंडने सलग दुसऱ्या लढतीत आॅस्ट्रेलियाचा तीन दिवसांमध्ये पराभव केला. गेल्या आठवड्यात एजबेस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ८ गडी राखून विजय मिळविला होता. यंदाच्या वर्षात इंग्लंडने प्रथमच सलग दोन कसोटी सामने जिंकण्याची कामगिरी केली. स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनच्या अनुपस्थितीत इंग्लंडने विजय मिळविल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. या लढतीत आॅस्ट्रेलिया संघ सुरुवातीपासून दडपणाखाली होता. पहिला डाव १११ चेंडूंमध्ये ६० धावांत संपुष्टात आला. पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी कारकिर्दीत ३०० बळींचा टप्पा गाठला. ब्रॉडने या लढतीत ८ बळी घेतले. प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ३९१ धावसंख्येवर घोषित केला. जो रुटने १३० धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ झाला त्या वेळी मायकेल क्लार्क या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याची चर्चा होती. या सामन्यानंतर मायकेल क्लार्कने निवृत्तीची घोषणा केली. आॅस्ट्रेलियाने आज खेळाला प्रारंभ केला त्या वेळी अ‍ॅडम व्होजेस (४८) आणि मिशेल स्टार्क (०) खेळपट्टीवर होते. स्टोक्सने स्टार्कला (०) माघारी परतवून आपला सहावा बळी नोंदवला.चार वेगवेगळ्या गोलंदाजांनी चार डावांमध्ये सहा बळी घेण्याची कामगिरी करणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे. अँडरसन व स्टीव्हन फिन यांनी एजबेस्टनमध्ये ही कमाल केली, तर येथे ब्रॉड व स्टोक्स यांनी येथे हा पराक्रम केला. वुडने जोश हेजलवुड (०) याला बाद करून आॅस्ट्रेलियाची ९ बाद ३४३ अशी अवस्था केली. त्यानंतर व्होजेसने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. मालिकेतील पाचवा व अखेरचा कसोटी सामना २० आॅगस्टपासून ओव्हलमध्ये खेळला जाईल. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया (पहिला डाव ६०). इंग्लंड : पहिला डाव ९ बाद ३९१ (घोषित). (जो रुट १३०, बेयरस्टा ७४, अ‍ॅलिस्टर कुक ४३, मोईन अली ३८, मार्क वुड २८, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद २४. मिशेल स्टार्क ६/१११, हेजलवूड २/९७, मिशेल जॉन्सन १/१०२).आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : ७२.४ षटकांत सर्व बाद २५३. (डेव्हिड वॉर्नर ६४, रॉजर्स ५२, एस. सी. व्होजेस नाबाद ५१, बेन स्टोक्स ६/३६, मार्क वुड ३-६९, स्टुअर्ट ब्रॉड १/३६).