शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाची अवस्था बिकट

By admin | Updated: August 7, 2015 22:35 IST

मिशेल स्टार्कचे सहा बळी आणि त्यानंतर डेव्हिड वॉर्नर व ख्रिस रॉजर्स या सलामीवीरांच्या शतकी भागीदारीनंतरही चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या

नॉटिंगहॅम : मिशेल स्टार्कचे सहा बळी आणि त्यानंतर डेव्हिड वॉर्नर व ख्रिस रॉजर्स या सलामीवीरांच्या शतकी भागीदारीनंतरही चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावातही संकटात सापडला आहे. पहिल्या डावात ६० धावांत खुर्दा उडालेल्या आॅस्ट्रेलियाने चहापानाला खेळ थांबला तेव्हा ४ बाद १३८ धावा केल्या आहेत. कर्णधार मायकल क्लार्क ० आणि अ‍ॅडम व्होजेस २ धावांवर खेळत आहेत. आॅस्ट्रेलियाचा संघ अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा फलंदाज बाकी आहेत.आॅस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ख्रिस रॉजर्सने ८३ चेंडूंत १० चौकारांसह ५२ आणि डेव्हिड वॉर्नरने ७४ चेंडूत ९ चौकार, २ षटकारांसह ६४ धावा केल्या. पहिल्या डावात ३३१ धावांनी पिछाडीवर पडलेल्या आॅस्ट्रेलियाला ख्रिस रॉजर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दुसऱ्या डावात दमदार सुरुवात करून देताना २४ षटकांत ११३ धावांची सलामी दिली; परंतु अवघ्या २५ धावांतच त्यांनी ३ मोहरे गमावले. त्यामुळे आॅस्ट्रेलियाची बिनबाद ११३ वरुन ४ बाद १३८ अशी बिकट स्थिती झाली.बेन स्टोक याने सलामीवीरांना २५ धावांच्या अंतरात बाद करताना आॅस्ट्रेलियाला तिहेरी धक्का दिला. स्टोक्सने प्रथम ख्रिस रॉजर्सला रुटकरवी झेलबाद केले आणि त्यानंतर दोन जीवदान मिळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला ब्रॉडकडे झेल देण्यास भाग पाडताना इंग्लंडला दुसरे यश मिळवून दिले. डेव्हिड वॉर्नरला अवघ्या १० धावांवर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर प्रथम कुकने, नंतर स्टोक्सच्या गोलंदाजीवर वॉर्नर ४२ धावांवर असताना स्लीपमध्ये बेलने त्याला जीवदान दिले होते. त्यानंतर स्टोक्सने शॉन मार्शला (२) तर पहिल्या डावातील स्टार स्टुअर्ट ब्रॉडने स्मिथला (५) बाद करीत आॅस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला.इंग्लंडचे लक्ष अजूनही विजयाकडे असून त्यामुळे त्यांना पाच सामन्यात ३-१ ने आघाडी मिळवून पुन्हा एकदा अ‍ॅशेज आपल्या नावावर करण्याची संधी आहे.पहिल्या डावात इंग्लंडने काल स्टुअर्ट ब्रॉडच्या १५ धावांतील ८ बळींच्या जोरावर आॅस्ट्रेलियाला अवघ्या ६० धावांत गुंडाळले होते आणि जो रुट याच्या शतकी खेळीच्या बळावर ४ बाद २७४ धावा केल्या होत्या. जो रुट (१३०) याने यॉर्कशायरचा त्याचा सहकारी जॉनी बेयरस्टा (७४) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी १७३ धावांची भागीदारी केली होती. रुटने आज १२४ या वैयक्तिक धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली.तथापि, रुट आज सकाळी जास्त वेळ टिकू शकला नाही आणि स्टार्कच्या गोलंदाजीवर तो यष्टीरक्षक पीटर नेव्हीलकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने १७६ चेंडूंत १९ चौकारांसह १३० धावा केल्या. कार्डिफमध्ये पहिल्या कसोटीत १३४ धावा करणाऱ्या रुटचे या मालिकेतील हे दुसरे शतक ठरले. नाईट वॉचमन मार्क वूडने २८ चेंडूंत ५ चौकारांसह ३२ धावांची खेळी केली. त्याला आणि जोस बटलर (१२) याला स्टार्कने त्रिफळाबाद केले. मोईन अली (२४ चेंडूंत ३८ धावा) याने आॅफ स्पिनर नाथन लियोनला षटकार ठोकताना इंग्लंडला ३५0 धावांचा आकडा पार करून दिला. ब्रॉडने (नाबाद २४ धावा) याने आपल्या घरच्या मैदानावर काही आकर्षक फटके मारले. संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया (पहिला डाव ६०). दुसरा डाव : २९ षटकात ४ बाद १३८. (डेव्हिड वॉर्नर ६४, रॉजर्स ५२. बेन स्टोक्स ३/२०, स्टुअर्ट ब्रॉड १/१५).इंग्लंड : पहिला डाव ९ बाद ३९१ (घोषित). (जो रुट १३०, बेयरस्टा ७४, अ‍ॅलेस्टर कुक ४३, मोईन अली ३८, मार्क वूड २८, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद २४. मिशेल स्टार्क ६/१११, हेजलवूड २/९७, मिशेल जॉन्सन १/१०२).