शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

भारत दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलियाची तयारी सुरू

By admin | Updated: January 10, 2017 01:49 IST

फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) आतापासून तयारीला सुरुवात केली आहे.

सिडनी : फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. डावखुरा फिरकीपटू स्टीफन ओकिफीला लाल चेंडूने सराव करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्याला सध्या सुरू असलेल्या बिग बॅश टी-२० लीगमधून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. आॅस्ट्रेलियाचा सिनिअर फिरकीपटू नॅथम लियोनसह ओकिफीचा सोमवारी मेलबोर्न रेनेगेड््सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी सिडनी सिक्सर्समध्ये समावेश होता; पण भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता हे खेळाडू पाचदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहेत. भारत दौऱ्यात ओकिफी व लियोन आॅस्ट्रेलियातर्फे मुख्य फिरकीपटूंची भूमिका बजावतील, अशी आशा आहे. सीएचे कार्यकारी महाव्यवस्थापक (संघाची कामगिरी) पॅट होवार्ड यांच्या मते, ओकिफीला लाल चेंडूने सराव करण्याची अधिक गरज आहे. होवार्ड म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या श्रीलंका दौऱ्यानंतर आम्ही भारत दौऱ्याच्या सर्वोत्तम तयारीसाठी क्रिकेट न्यू साऊथ वेल्स व स्टीव्हसोबत चर्चा करीत आहोत.’ त्याने म्हटले की, ‘अलीकडे झालेल्या दुखापतीमुळे मला शेफील्ड स्पर्धेत सहभागी होता आले नाही. भारत दौऱ्यासाठी असलेल्या संभाव्य खेळाडूंच्या तुलनेत मला लाल चेंडूने अधिक सराव करता आलेला नाही. ज्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळायचे आहे त्यासाठी त्या प्रकारच्या क्रिकेटचा अधिक सराव करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे.’होवार्ड पुढे म्हणाले, ‘आता त्याचे लक्ष ग्रेड व फ्युचर्स लीग क्रिकेटवर केंद्रित झाले आहे. जानेवारीअखेर दुबईमध्ये भारत दौऱ्यासाठी होणाऱ्या सराव शिबिरात तो सहभागी होण्याची आशा आहे.’आॅस्ट्रेलिया संघ भारतातील कसोटी कामगिरीत सुधारणा करण्यास उत्सुक आहे. आॅस्ट्रेलियाला गेल्या दौऱ्यात भारतात ४-०ने पराभव स्वीकारावा लागला होता. भारत दौऱ्यात आॅस्ट्रेलिया संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून, पहिली कसोटी २३ फेब्रुवारीपासून पुणे येथे खेळली जाणार आहे. (वृत्तसंस्था)जम्पामध्ये कुंबळेची झलक : हसी४अ‍ॅडम जम्पाच्या गोलंदाजीमुळे महान गोलंदाज अनिल कुंबळेची आठवण येते, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसीने व्यक्त केली. या युवा लेग स्पिनरने गेल्या वर्षी उपखंडामध्ये चमकदार कामगिरी करीत भारताच्या आगामी दौऱ्यासाठी स्वत:च्या निवडीचा दावा सादर केला आहे. ४जम्पाला भारतातील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेत त्याने आॅस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या साथीने तो राइजिंग पुणे सुपरजायन्ट्स संघातर्फे खेळला होता. ४आॅस्ट्रेलियातर्फे उपखंडात मर्यादित षटकांचे ११ सामने खेळणाऱ्या २४ वर्षीय जम्पाने १६.११ च्या सरासरीने १८ बळी घेतले आहेत.हसी म्हणाला, ‘कुंबळे उंच चणीचा गोलंदाज होता; पण तो चेंडू अधिक वळवीत नव्हता. तो याच पद्धतीने यशस्वी ठरला. कुंबळे महान खेळाडू असून, त्यांच्यासोबत जम्पाची तुलना करणे घाईचे ठरेल. पण दोघांच्या गोलंदाजांची शैली बऱ्याचअंशी समान आहे. त्यामुळे त्याची तुलना करता येईल.’